पिंपरी, पुणे (दि. ३१ जानेवारी २०२४) मावळ येथे आयोजित केलेल्या ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पिंपरी येथील एच. ए. स्कूलच्या अभिज्ञ कुलकर्णी याच्या ‘एक्सीडेंट अलर्ट इंडिकेटर’ या प्रयोगास नववी ते बारावी या गटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व विज्ञान अध्यापक संघ, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ व विज्ञान अध्यापक संघ तालुका मावळ जिल्हा पुणे या संस्थांनी ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे कामशेत येथील व्ही. आय. टी. महाविद्यालयात आयोजन केले होते. अभिज्ञ कुलकर्णी याच्या या प्रयोगाची पेटंट नोंदणी झाली आहे. त्याला शिवयोगेश्वर हवीनाळ आणि श्वेता नाईक यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, शाळा समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे यांनी अभिनंदन केले.