माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व रावेत स्पोर्टस असोसिएशन यांच्या वतीने आयोजन
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२४) माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व रावेत स्पोर्टस असोसिएशन आयोजित ‘रावेत प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धे’त सोळा वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात ‘भालचंद्र विहार’ संघाने ‘महालक्ष्मी रेसिडेन्सी’ संघाचा तीन धावांनी पराभव करून प्रथम क्रमांकाचा करंडक व रोख पारितोषिक पटकावले.
रावेत स्पोर्ट्स असोसिएशनच्या या स्पर्धाचे हे सातवे वर्ष होते. त्यात बारा, सोळा वर्षांखालील मुले – मुली, महिला व पुरुष खुला स्पर्धा झाल्या. सोळा वर्षाखालील मुलांच्या भालचंद्र विहार या विजयी संघात कर्णधार प्रीत हृदानि, वेदांत कारले, मोहनीश भावसार, आदित्य घुगे, इशांत मानकर, मनीत देसाई, वेंकटेश शेवकरी व अर्णव शिंदे यांचा सहभाग होता. विशाल गाढे व योगेश भावसार मार्गदर्शन होते. तसेच, या संघातील सर्व खेळाडू हे उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट यष्टिरक्षक होते. मनीत देसाई याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. विजयी संघातील खेळाडूंना मोरेश्वर भोंडवे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी दत्तात्रय भोंडवे, चेतन भुजबळ, मयूर कलाटे, बी. एन. जाधव, ऋषिकेश भोंडवे, कुणाल भोंडवे, तुषार फलके, संदीप धोपट, राकेश पाटील, संतोष रेगे आदी उपस्थित होते.