पुणे- मंडल आयोगास चॅलेंज केले तर ओबीसींचे नुकसान होईल. कोणते चॅलेंज देऊन मला ओबीसी समाजाचे मुलांचे नुकसान करायचे नाही. राजकीय स्वार्थासाठी आरक्षण बाबत चॅलेंज केले जाऊ नये.असे मत व्यक्त करताना येथे मनोज जरांगे म्महणाले कि मराठा मुलानी सांगितले की आम्ही मुंबईला जाताना आरक्षण घेऊन येऊ त्याप्रमाणे आम्ही घेऊन आलो आहे. कायद्यामार्फत सगेसोयरे प्रमाणपत्र मिळाले की पुन्हा एक महादिवाळी साजरी केली जाणार आहे. तसेच एक मोठी जाहीर सभा घेतली जाणार आहे. आमच्या ज्या कुणबी नोंदी मिळाल्या त्या चॅलेंज होऊ शकणार नाही. राजकीय आरक्षणा बाबत अद्याप मला कोणी विचारले नाही. तो उद्देश धरून माझे आंदोलन नाही. ज्या सवलती ओबीसी यांना मिळत आहेत, त्या आम्हाला मिळाव्या हीच अपेक्षा आहे. आम्ही झुंडशाहीने वागत नसून हक्क मागत आहोत, असेही जरांगे म्हणाले. त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला.
जरांगे म्हणाले, मी प्रथम नेतृत्व हातात घेतले नाही मला नेतृत्व नको होते. पण आंदोलन प्रामाणिक केले पाहिजे अशी भावना होती. विनाकारण पैसे गोळा करण्यात मी कधी पडलो नाही. मला राजकारणाचा वारसा नाही. मी शेतकरी कुटुंबातील आहे. येवल्याचा माणूस म्हणाला मी पाचवी शिकलेलो आहे. सरकारने माझी सर्व माहिती काढली. मी बारावी शिकलो आहे आणि मी खूप पुस्तके वाचली नाही. पण अनेक वर्ष रोज लोकांचे प्रश्न हाताळत गेलो. मी बारीक दिसत असल्याने कोण माझ्यावर विश्वास ठेवत नाही. 29 ऑगस्ट रोजी मी मराठवाडा मधील लोकांना एकत्र करून अडीच लाख लोकांचे आंदोलन केले.
माझ्या गावातील लोकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. अनेक जन गंभीर जखमी झाले. शांततेत आमरण उपोषण आंदोलन केल्याने अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. पोलिस आणि प्रशासन यांनी मला विनंती केल्यावर मी समाजाला सांगितले आणि शांततेत लोक घरी गेले. त्यानंतर पोलिसांनी ज्या प्रकारे लाठीमार, गोळीबार केला त्यामुळे अमानुष प्रकार कधी बघितला नाही. मी 12 दिवस बिना पाणी, अन्न राहू शकतो. उपचार घेतो मी म्हणालो तरी त्यानंतर मोठ्या प्रमाणत पोलिस फोर्स आणून आंतरवली मध्ये अचानक लाठीमार केला गेला हा सर्वात मोठा डाग आहे.
सरकार मला ज्या 58 लाख नोंदी मिळाला असे सांगत आहे त्याबाबत सविस्तर माहिती देत नाही. या नोंदी जुन्या आहे पण नव्याने मिळाल्या आहे. कारण ज्यांना नोंदी मिळाल्या ते मला सांगत आहे. आमच्याकडे पुरावा असल्याशिवाय आम्ही बोलत नाही. कोणते चॅलेंज देऊन मला ओबीसी समाजाचे मुलांचे नुकसान करायचे नाही. राजकीय स्वार्थासाठी आरक्षण बाबत चॅलेंज केले जाऊ नये. आम्ही गावात जाऊन छगन भुजबळ यांना समजावून सांगा असे सांगणार आहोत. कारण मंडल आयोगास आम्ही आक्षेप घेतला तर ओबीसी यांचे नुकसान होईल.