संस्थेच्या उभारणीत योगदान दिलेल्या माजी सदस्यांचा सन्मान
पुणे : सीकेपी सेंटर फॉर कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड प्रोफेशन्स या सीकेपी समुदायाला एकाच छताखाली आणण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी, स्थापन झालेल्या संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन रेसिडेन्सी क्लबमध्ये साजरा करण्यात आला. संस्थेच्या उभारणीत योगदान दिलेल्या माजी अध्यक्षांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.सुधीर डोंगरे हे प्रमुख पाहुणे होते. संस्थापक अध्यक्ष अशोक दुर्वे, अध्यक्ष निरंजन कोंढवीकर यावेळी उपस्थित होते.
सीकेपी केंद्राची स्थापना २४ जानेवारी १९९९ रोजी दत्ता देशपांडे, फाउंडर प्रेसिडेंट अशोक दुर्वे, जगदीश देशपांडे, सुभाष गुप्ते आणि समाजातील विविध व्यक्तींच्या समर्थ मार्गदर्शनाखाली व प्रयत्नांतून करण्यात झाली. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, पुणे येथे आयोजित स्थापना समारंभास दादासाहेब देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ग्रुप कॅप्टन मनोहर वडगावकर आणि पुण्यातील अनेक मान्यवरही उपस्थित होते.
स्थापनेपासूनच सीकेपी सेंटर पुण्यातील सीकेपी समुदायाला एकाच छताखाली आणण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी आणि तरुण सीकेपी पिढीला स्वतःचा उपक्रम सुरू करण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. केंद्र वर्षभर, नवीन अध्यक्ष आणि कार्यकारी समितीच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, शिक्षण आणि इतर समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करते.
दोन दिवसीय रौप्य महोत्सवी उत्सवाचा एक भाग म्हणून, २३ जानेवारी २०२४ रोजी सिकेपी केंद्राने पाककृती स्पर्धा आणि ईशा काथवटे आणि समूहाचे कथ्थक नृत्य सादरीकरणाचे आयोजन केले होते. शर्मिला पालकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.