पुणे- सध्या PMPML विविध मार्गाने प्रसिद्धी झोतात आहे. बेकायदा भरती, प्रमोशन असो , अपघात, आणि बस भुरट्याना सहज पळवून नेता येईल अशी बेपर्वाई असो PMPML मेट्रोच्या पेक्षा जास्त वेगाने प्रसिद्धी घेत आहे आणि तितक्याच विरोधी स्लो पद्धतीने रस्त्यावर धावते आहे.आता १ हजार बसेसच्या खरेदीत महापालिकांना ६० कोटींना झोपविण्याचे काम PMPML करणार असल्याच्या वार्ता आहेत यामुळे भाजपचे जुने जाणते ज्येष्ठ नेते विकास मठकरी यांनी आता आवाज उठविला आहे आणि भाजपाचे लोक हो आता जागे व्हा , वस्तुस्थिती समजावून घ्या , आणि सामान्य जनतेचे पैसे कोण खातो हे समजावून घ्या , आणि पुणेकरांचे पैसे वाचवा हो अशी आर्त विनंती.. विकास मठकरी यांनी केली आहे.
त्यांनी असे म्हटले आहे कि,’ PMPML ला एक हजार बसेसची खरेदी करायची आहे , CNG, NON AC , BRT , बसेस खरेदी केल्या जाणार आहेत ते बसेसची खरेदी आवश्यकच आहे पण ..पण पुन्हा टाटा कि अशोक लेलॅंड हा जुना वाद , जुनी स्पर्धा आजच्या मितीला सुरु असून ती पुणेकरांचे ६० कोटी खाणार असल्याचे समजले आहे. या खरेदी मध्ये TATA आणि अशोक लेलॅंड अंतीम स्पर्धेत आल्या. एका बसमागे मागे TATA ने कोट केल्या 52 लाख 60 हजार , तर अशोक लेलॅंड 58 लाख 21 हजार ..! आता नियमानुसार कमी दर देणाऱ्या TATA ला बसेसची ॲार्डर मिळायल हवी होती . पण , छे ..! ॲार्डर अशोक लेलॅंडला ..! सरळ सरळ 6 लाख रुपयानी प्रत्येक १ बस महाग ..! म्हणजे 60 कोटी रुपये जास्त देणार ? पैसा जनतेचा ,मग हे का ? सरळ सरळ भ्रष्टाचार..!
अहो , सामान्य प्रवासी तासनं तास वाट बघत असतो बिचारा PMPML ची ..! पण ? जावू दे खड्ड्यात ..! माझा खिसा भरला हेच मतलब .! दुर्दैव..!पण हेच चालू आहे ..!अक्षरशः पारंपरिक पणे ..!भाजपाचे लोक आता जागे व्हा , वस्तुस्थिती समजावून घ्या , आणि सामान्य जनतेचे पैसे कोण खातो हे समजावून घ्या , आणि पुणेकरांचे पैसे वाचवा ही विनंती..!
असे खुद्द पुण्याचे अभ्यासू नगरसेवक अशी प्रतिमा असलेले माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते मठकरी यांनी म्हटले आहे. आता हे सध्याचे विद्यमान पदाधिकारी आणि मंत्री किती गंभीरपणे घेणार ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच .
‘पीएमपी’ ने स्वमालकीच्या एक हजार ‘सीएनजी’, ‘नॉन-एसी’, ‘बीआरटी’ बस खरेदीसाठी काढलेल्या निविदेत ‘टाटा मोटर्स’ आणि ‘अशोक लेलँड’ या दोन कंपन्या पात्र ठरल्या होत्या. मूळ निविदेनुसार ‘टाटा’ ने प्रति बस सुमारे ३९ लाख नऊ हजार रुपयांचा दर दिला होता, तर ‘अशोक लेलँड’चा दर ४४ लाख ३० हजार रुपये होता. ‘जीएसटी’ व ‘आयटीएमएस’ सह टाटाची बस ५२लाख ६० हजार, तर अशोक लेलँडची बस ५८ लाख २१ हजार रुपयांना पडत होती. मूळ निविदेत ‘टाटा’ सर्वांत कमी दराने निविदा भरणारी कंपनी होती.तरीही टाटा ला टाटा करण्याची जादू करण्यात आल्याचे वृत्त आहे. पॅसेंजर डिस्प्ले बोर्ड, सीसीटीव्ही, ड्रायव्हर मॉनिटरिंग, पॅनिक बटण, व्हेइकल ट्रॅकिंग, बस हेल्थ मॉनिटरिंग यांसारखी सर्व यंत्रणा मूळ निविदेच्या कक्षेत आधीच समाविष्ट होती.

