कोच नं सी 15 रुळावरून घसरला
पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला. मुंबईवरुन सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेचा कोच नं सी 15 रुळावरून घसरला.पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ट्रेन येत असताना हा अपघात झाला, त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.दरम्यान, वंदे भारत ट्रेनचा कोच रुळावरुन घसरल्याची ही पहिलीच घटना आहे,ट्रेन नंबर 22225 मुंबई ते सोलापूर Vande Bharat Express ही गाडी पुणे स्थानकात सायंकाळी सुमारे 7.30 वाजता प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करत असताना डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरली.पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत या क्रॉसिंगच्या उन्नतीकरणाचे काम नियोजित आहे, तेव्हा ट्रेनला किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.वंदे भारत ट्रेनमधील सी 15 या कोचमधील सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

