बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

Date:

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी व्यापारासाठी वापरले जाणारे चार कुंटणखाने एक वर्षासाठी सील केले आहेत. या कारवाईत भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांनाही अटक करण्यात आली आहे. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‘न्यू वेलकम’, ‘बेगम बिल्डिंग’ आणि ‘दाणे आळी’ येथील जुन्या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंटणखाने चालवले जातात . या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी या इमारतींमधील फ्लॅट सील करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. मिळालेल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून, पोलिस आयुक्तांनी संबंधित ठिकाणे सील करण्याचे आदेश दिले. यामध्ये बेगम बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक ३०१, न्यू वेलकम बिल्डिंगमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅट आणि दाणे आळीतील अग्रवाल मावावाला वाड्यातील उत्तर बाजूचा एक रूम, असे एकूण चार फ्लॅट पुढील एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहेत.

याच कारवाईदरम्यान, पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी रेड लाईट एरियामध्ये अवैधपणे राहणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केलेल्या कारवाईत जोशना शकुर अली, कुलसुम खातून आणि अंजुरा बेगम या तीन बांगलादेशी महिलांना संशयास्पदरीत्या फिरताना पकडण्यात आले. या महिला मागील एका महिन्यापासून विनापरवाना भारतात राहत असून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांचा शोध घेत होत्या. त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे मिळाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

ही धडक कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे आणि पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले,सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे, चंद्रकांत जवळगी, महिला पोलीस उप-निरिक्षक पुजा जाधव, पोलीस अमंलदार शिवाजी शिंदे, विशाल शिंदे, गजानन सोनुने, महेश पवार, वसिम शेख, महिला पोलीस अंमलदार वनिता कांबळे व वैशाली चौगुले, यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात शाळेला सुट्टी म्हणून मुले खुश असतात. फळांच्या राजाचा...

पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका:मंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. 27 एप्रिलमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष...