आ.संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची प्रकाशक संघाची मागणी

Date:

पुणे – ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीचा तीव्र शब्दात निषेध करून, त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठी प्रकाशक संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी पाठविलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, आमदार संजय गायकवाड यांच्याकडून नुकतेच दूरध्वनीवर प्रकाशक प्रशांत आंबी यांनाअतिशय गैर शब्दामध्ये धमकावले गेले आहे. या संवादामध्ये गायकवाड यांनी केलेली शिवीगाळ, त्यांच्याकडून दिल्या गेलेल्या धमक्या या अतिशय निंदनीय आणि आक्षेपार्ह आहेत. दिवंगत ज्येष्ठ लेखक श्री. गोविंद पानसरे आणि प्रकाशक यांना या सर्व दूरध्वनीवरील संभाषणामध्ये अतिशय अर्वाच्य भाषेत जी शिवीगाळ केली आहे ती कुणीही कुणास करू नये अशीच असताना आमदार पदावरील व्यक्तीने करणे हे अतिशय वेदनादायी व चीड आणणारे आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जीवाला अपाय करण्याची धमकीही यामध्ये दिली गेल्याचे ऐकिवात आहे.कोणत्याही कारणासाठी निषेध नोंदवण्यासाठी अनेक योग्य मार्ग असतात.पण ते न वापरता अशा प्रकारे भाषा करणे, धमकावणे आणि शिवीगाळ करणे अजिबात योग्य नाही. त्यामुळे या प्रकाराचा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकाशक व लेखकांच्यातर्फे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ जोरदार निषेध नोंदवत आहे.याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण जास्तीत जास्त कठोर व योग्य ती पावले उचलाल अशी आम्ही अपेक्षा करतो. अशी कारवाई झाली तरच अशा प्रकारांना भविष्यात आळा बसेल असे नमूद करून प्रकाशक संघ अपेक्षित कठोर कृतीच्या प्रतिक्षेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...

दिल्ली-टेकऑफ दरम्यान स्विस विमानाला आग :6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 प्रवासी होते

नवी दिल्ली-दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी...

भोंदू बागेश्वर मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन:त्याने स्वतःपासूनच 4 मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, रोहित पवार यांचा टोला

मुंबई--नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी...

बेकायदा होर्डिंग्जने गिळले महापालिकेचे १८७ कोटी तर अधिकृत होर्डिंग्जने देखील दिला ८०० कोटीचा फटका ?

पुणे- महापालिकेच्या हद्दीत गेल्या ७ वर्षापासून बेकायदा १५०० होर्डींग्जने...