यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

Date:

मुंबई, : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने किवळे – देहूरोड–तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येतील.
तसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील.

या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे व दिलेल्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा.

दरम्यान, या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा पण …

एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा - मुख्यमंत्री...

अस्पृश्यता पाळण्याऱ्या बागेश्वरबाबाला माजी सरन्यायाधीशांचा पाठिंबा आहे का ? – सुनील माने

पुणे ता. २२ : संविधानविरोधी, विज्ञानविरोधी, अस्पृश्यता पाळून...

काँग्रेसकडून महिलांसमवेत महाराष्ट्राचा विश्वासघात

पुणे : काँग्रेससह इंडी आघाडीने नारी शक्ती वंदन अधिनियम...