ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

Date:

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी यांच्या ‘मायनोरटी अँड इंडियन ख्रिचन मेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री’ हि अधिकृत स्थापना शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता. मारिया असुंटा कोन्वेंट हॉल, रुबी हॉल क्लिनिक समोर, संजीवनी आश्रमा समोर, ढोले पाटील रोड, पुणे येथे समारंभपूर्वक संपन्न होणार आहे. बिशप सायमन अल्मेडा, बिशप अल्फ्रेड तिवाडे आणि इंडो इस्त्रायल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष गुल क्रिपलानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहतील अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लुकस केदारी यांनी दिली.

या कार्यक्रमास सर्व राजकीय, सामाजिक, व्यवसायिक नेते,काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,मोहन जोशी, एनआयसीएचई चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विशाल मोरेश्वर,, प्रशांत जगताप, राहुल डंबाळे, खिसाल जाफरी हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.
यासोबतच महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, आयोगाच्या माजी उपाध्यक्षा जेनेट डिसूझा, संस्थेचे अध्यात्मिक संचालक फादर एन्थोनी डिसूझा आणि पीटर जॉर्ज तसेच मारिया गोरेट्टी आणि उद्योगपती पीटर डिसूझा हे देखील उपस्थित राहणार आहेत.

पुण्यासारखे प्रमुख शहर उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रात अग्रेसर असून पुण्यात अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाचे असंख्य उद्योजक व व्यावसायिक आहेत. त्यांचे संघटन करणे त्यांच्या अडचणींमध्ये मार्गदर्शन करणे व नवीन उद्योजक व व्यावसायिक तयार होण्यासाठी प्रयत्न करणे हे संस्थेचे उद्देश असून संस्थेच्या स्थापनेनंतर किमान १००० सदस्य संख्या होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर या मॉडेलचा अनुभव लक्षात घेत महाराष्ट्रात प्रत्येक मोठ्या शहरात आणि तालुका व जिल्ह्यामध्ये संस्थेच्या शाखा उघडल्या जातील. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लुकस केदारी यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

​लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या ऑनलाईन बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ​बँकांच्या...

पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा-वसंत मोरे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय...