अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा निर्णय

Date:

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध..

पुणे: नगरसेवक पदाचे मानधान नाकारून तो निधी महापौर वैद्यकीय सहायता निधीमध्ये वर्ग करणारे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग २५ मधील नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची आज विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदभार स्वीकारतानाच बाप्पू मानकर यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारून, त्यातून वाचणारा खर्च गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आज पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडलेल्या निवडणुकीत, प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथील नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर यांची बिनविरोध झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळातील काम हे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून करणार असल्याचे सांगितले.

गाडीचा मोह टाळला; सेवेला प्राधान्य!

अध्यक्षपदी निवड होताच बाप्पू मानकर यांनी एक नवा आदर्श पायंडा घालून दिला. महापालिकेकडून प्रभाग समिती अध्यक्षांना मिळणारी शासकीय चारचाकी गाडी त्यांनी नम्रपणे नाकारली. या वाहनावर होणारा वार्षिक खर्च हा पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ‘गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी’ वर्ग करावा, अशी लेखी विनंती त्यांनी प्रशासनाला केली. “नागरिकांच्या कररूपी पैशातून मिळणाऱ्या अवास्तव सुविधा न घेता, केवळ ‘सेवक’ म्हणून काम करणे हेच माझे ध्येय आहे,” अशी भावना बाप्पू मानकर यांनी यावेळी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी...

रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणामध्य...

काही ठिकाणी ओव्हरहेड शिस्तबद्ध केबल आणि काही ठिकाणी भूमिगत, बैठकित सांगितले SOP ठरवा ..

पुणे- महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड केबलचे जाळे शिस्तबद्ध करणे आणि...

मंत्री माधुरी मिसाळांच्या पत्राने सावळा गोंधळ..

पुणे- राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्य मंत्री असलेल्या...