तीन-चाकी इलेक्ट्रिक वाहनांचा भारतात प्रसार करण्यासाठी ह्युंदाई मोटर आणि टीव्हीएस मोटर यांची भागीदारी

Date:

· ह्युंदाई मोटर कंपनी आणि टीव्हीएस मोटर कंपनी यांनी भारत आणि इतर बाजारपेठांमध्ये तीन-चाकी इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच  त्यांचे व्यापारीकरण करण्यासाठी संयुक्त विकास करार केला आहे.
· इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील दोन्ही कंपन्यांचे नैपुण्य आणि ग्राहकांच्या गरजा हे एकत्र करून, ही उत्पादने संयुक्तपणे विकसित केली जातील.
·दोन्ही कंपन्या आपापले अभियांत्रिकी कौशल्य एकमेकांसोबत सामाईक करतील; यामध्ये ह्युंदाई मोटरचा मानवकेंद्रित दृष्टिकोन आणि टीव्हीएस मोटरचा प्रगत इलेक्ट्रिक तीन-चाकी प्लॅटफॉर्म याचा यात समावेश असेल.

नवी दिल्ली – भारताच्या ‘लास्ट-माईल मोबिलिटी’च्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या, नावीन्यपूर्ण इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहनांच्या (E3W) उपायांचा विकास आणि त्यांचे व्यापारीकरणाला चालना देण्यासाठी ह्युंदाई मोटर कंपनी (Hyundai Motor) आणि टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड (TVS Motor) यांनी एका संयुक्त विकास करारावर (JDA) स्वाक्षरी केली आहे.

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025′ मध्ये E3W संकल्पनेचे यशस्वी सादरीकरण झाल्यानंतर ही भागीदारी करण्यात आली. भारतीय ग्राहकांसाठी योग्य  गतिशीलता पर्याय  उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ही भागीदारी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तसेच, शाश्वत शहरी वाहतुकीप्रती दोन्ही कंपन्यांची कटिबद्धता अधिक दृढ करते.

या करारानुसार, संशोधन आणि विकास क्षेत्रातील नैपुण्य, प्रगत गतिशीलता तंत्रज्ञान आणि मानवकेंद्रित रचनात्मक दृष्टिकोनाचा लाभ घेत, ह्युंदाई मोटर्स E3W च्या रचनेचे नेतृत्व करेल आणि त्याचा संयुक्तपणे विकास करेल.

“ह्युंदाई मोटर कंपनीने भारताला एक प्रमुख बाजारपेठ मानून, येथील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी योगदान देण्याच्या विविध मार्गांचा दीर्घकाळापासून शोध घेतला आहे; आणि टीव्हीएस मोटर सोबतची आमची ही भागीदारी, याच प्रयत्नांतून घेतलेला एक धोरणात्मक निर्णय आहे. या संयुक्तपणे विकसित केलेल्या E3W मुळे देशभरातील लोकांना अधिक सुरक्षित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, अशी आशा आम्हाला आहे.” – जुंगसून कोवरिष्ठ उपाध्यक्षकॉर्पोरेट रणनिती आणि नियोजनह्युंदाई मोटर कंपनी.

भारतातील वाहतुकीशी संबंधित वेगवेगळ्या आव्हानांवर मात करता येईल अशाचप्रकारे E3W ची रचना केली जाईल; तसेच स्थानिक रस्त्यांची स्थिती आणि शहरी पायाभूत सुविधांशी सुसंगत असे शाश्वत उपाय उपलब्ध करून देता येतील.

आपल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मचा, तीन-चाकी वाहनांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील सखोल अनुभवाचा आणि स्थानिक बाजारपेठेच्या सखोल ज्ञानाचा वापर करून टीव्हीएस मोटर या उत्पादनाचा संयुक्तपणे विकास करेल. विश्वास आणि गुणवत्तेवर भर देण्याच्या आपल्या दीर्घकालीन परंपरेचा आधार घेत, टीव्हीएस या वाहनाच्या स्थानिक विक्रीचे नेतृत्वही करेल; तसेच भारतातीलच आपल्या उत्पादन सुविधांद्वारे भारतीय बाजारपेठेची मागणी आणि भविष्यातील निर्यातीची पूर्तता करेल.


या घडामोडीवर भाष्य करताना, टीव्हीएस मोटर कंपनीचे ग्रुप स्ट्रॅटेजी विभागाचे अध्यक्षशरद मिश्रा म्हणाले, “शाश्वत आणि सुलभ गतिशीलतेद्वारे जीवनमान उंचावण्याचे आमचे ध्येय आहे. हा संयुक्त विकास करार ह्युंदाई मोटर कंपनीसोबतच्या आमच्या भागीदारीतील एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि इलेक्ट्रिक तीन-चाकी पर्याय विकसित करण्याच्या आमच्या सामाईक महत्त्वाकांक्षेला पुढे नेतो. आमचा तीन-चाकी इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म, अभियांत्रिकी कौशल्य आणि ग्राहकांच्या गरजांची सखोल जाण यांसारख्या पूरक क्षमतांना एकत्र आणून, आम्ही भारत आणि इतर बाजारपेठांसाठी विशेष उत्पादने वितरीत करण्यास सुसज्ज आहोत. हे सहकार्य विस्तारक्षम, दीर्घकालीन लास्ट-माईल गतिशीलतेप्रती आमची वचनबद्धता अधिक दृढ करते, तसेच तंत्रज्ञान, गुणवत्ता, ग्राहक अनुभव आणि विश्वासाचा वारसा यांमध्ये नवीन मापदंड निर्माण करते.”

शाश्वत लास्ट माईल मोबिलिटी इनोव्हेशनमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून, जगातील तीन-चाकी वाहनांसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात पहिले वाहन वितरित करण्यासाठी दोन्ही कंपन्या संयुक्त विकास करारांतर्गत वचनबद्ध आहेत.

या भागीदारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे E3W मॉडेलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या घटकांचे उत्पादन स्थानिक पातळीवर करण्याचे वचन. यासाठी आवश्यक प्रमुख घटक भारतातूनच स्थानिक पातळीवर मिळवले जातील आणि तयार केले जातील. हा धोरणात्मक दृष्टिकोन अनेक उद्दिष्टे साध्य करतो: तो भारताच्या ऑटोमोटिव्ह पुरवठा साखळी परिसंस्थेला बळकट करतो, रोजगाराच्या संधी निर्माण करतो, वाहनांचा एकूण खर्च कमी करतो आणि ग्राहकांसाठी विक्री-पश्चात जलद सेवा आणि सुट्या भागांची उपलब्धता सुनिश्चित करतो.

संकल्पना ते वास्तव

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये प्रामुख्याने समोर आलेल्या E3W संकल्पनेमध्ये भारतीय वाहतूक आव्हानांना अनुरूप अशी नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यात आली. यामध्ये पावसाळ्यात प्रभावित होणाऱ्या रस्त्यांसाठी योग्य ग्राउंड क्लिअरन्स, वर्धित सुरक्षा वैशिष्ट्ये, लांबच्या प्रवासासाठी सुलभ रचना, उष्णकटिबंधीय हवामानासाठी सुधारित थर्मल मॅनेजमेंट आणि प्रवासी वाहतुकीपासून ते मालवाहतूक तसेच आपत्कालीन सेवांपर्यंतच्या विविध उपयोगांसाठी लवचिक अंतर्गत रचना यांचा समावेश आहे.

संकल्पना-शोधनापासून ते प्रत्यक्ष उत्पादन विकास आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादनापर्यंतच्या संक्रमणाला हा करार औपचारिक स्वरूप देतो. भारतीय नियामक मानके आणि ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, या वाहनाला कठोर चाचण्या, स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक सुधारणा आणि प्रमाणीकरण प्रक्रिया पार पाडावी लागेल.

ह्युंदाई मोटरची ‘मानवतेसाठी प्रगती’ ही मूळ संकल्पना तसेच दूरदृष्टी उदयोन्मुख बाजारपेठांसाठी गतिशीलता उपायांची पुनर्कल्पना करण्यापर्यंत विस्तारते. कंपनीचे जागतिक अभियांत्रिकी कौशल्य आणि टीव्हीएस मोटरची इलेक्ट्रिक गतिशीलता, तसेच महत्त्वाचे म्हणजे भारतीय ग्राहकांविषयीची सखोल समज यांचा मिलाफ साधून, ही भागीदारी तंत्रज्ञान, आवाक्यातील किंमत, टिकाऊपणा आणि सुरक्षितता यांचा समतोल साधणारी E3W ऑफर सादर करण्यासाठी सज्ज आहे. रोमांचक, जबाबदार, टिकाऊ आणि सुरक्षित गतिशीलता उपायांद्वारे जगभरातील जीवनमान बदलण्याच्या टीव्हीएस मोटरच्या दूरदृष्टीशी सुसंगत असलेले हे उत्पादन, भविष्यातील भारताला आवश्यक असलेला बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

विकासाच्या कालमर्यादा आणि नियामक मंजुरी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी, दोन्ही कंपन्यांनी केवळ याच प्रोजेक्टसाठी आणि विविध कार्यक्षेत्रांचा समावेश असलेल्या टीमची स्थापना केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कौशल्याच्या संधी: रोजगाराच्या हमी

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे,...

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात:सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...

महिला आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी खुली चर्चा करा:सुषमा अंधारे यांचे जाहीर आव्हान

पुणे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी...

नाशिकला 5 तास विजांचा कडकडाट , अर्ध्या तासात 18 विजा काेसळल्या

प. महाराष्ट्रात 21 ते 23 दरम्यान वादळी पावसाचा इशारा नाशिक:...