शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात:सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

Date:

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या मुंबई स्थित ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. तिथे त्यांच्या काही टेस्ट सुरू आहेत. त्या झाल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयीची स्पष्टता येईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार यांना मागील महिन्यातच पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज बारामतीत सांगता सभा आहे. या सभेला महाविकास आघाडीतर्फे स्वतः सुप्रिया सुळे हजर राहणार आहेत. स्वतः सुनेत्रा पवार यांनी त्यांना सभेचे निमंत्रण दिले आहे. या सभेची माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची उपरोक्त माहिती दिली. त्या म्हणाल्या, शरद पवार आजच्या सांगता सभेला उपस्थित राहणार नाहीत. कारण, ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. तिथे त्यांच्या काही टेस्ट सुरू आहेत. त्या झाल्यानंतरच याविषयीची स्पष्टता येईल.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीला आज सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा होत आहे. मला कालच त्यांचा फोन आला होता. त्यांनी मला कुटुंब म्हणून प्रचाराला येण्याचे निमंत्रण दिले. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वप्रथम ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा निर्णय घेतला होता. आम्ही पहिली भूमिका मांडली. त्यानंतर काँग्रेस व उद्धव ठाकरे यांनीही सहकार्याचीच भूमिका घेतली. आज महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे मी कुटुंब म्हणून त्यांच्या सभेला जाईल. पण मित्र पक्ष म्हणून माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे नैतिकता म्हणून मी काल काँग्रेस व उद्धव ठाकरेंशीही बोलले. दोन्ही पक्षांची सहकार्याची भूमिका आहे. त्यांचे म्हणणे होते की, तुम्ही कुटुंब म्हणून जाणार असाल तर जा आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलाच आहे. त्यामुळे मी सभेला जाऊन सुनेत्रावहिनींना शुभेच्छा देईन.
सुप्रिया सुळे यांनी सध्या पक्षात विलिनीकरणाच्या मुद्यावर कोणतीही चर्चा सुरू नसल्याचेही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, या प्रकरणी माझ्या कानावर काहीही नाही. हा विषय समोर नाही. अजितदादा होता तोपर्यंत गोष्ट वेगळी होती. आता तो नाही. गोष्टी बदलल्या आहेत. कुटुंब म्हणून नैतिक जबाबदाऱ्या घेणे ही आमची जबाबदारी आहे. माझ्या सर्वच बहिणी व भाऊ सक्षम आहेत. फक्त इथेच नाही तर पक्षही आमचे कुटुंब आहे. पण आत्तापुरते अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. पुलावरून खूप पाणी गेले आहे. आता पुन्हा पुन्हा त्या चर्चा करण्यापेक्षा महाराष्ट्र व देशापुढे काय प्रश्न आहेत? हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे भाजपशी मतभेद आहेत, पण मनभेद कुणाशीच नाहीत. काही गोष्टी जबाबदारी म्हणून करायच्या असतात. आम्ही आज महाविकास आघाडी म्हणून सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला आहे. तो दादांना श्रद्धांजली म्हणून दिला आहे. माझा भाऊ गेलाय. मला दादांच्या प्रकरणात पोटनिवडणूक येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. कुणाच्याच आयुष्यात पोटनिवडणूक येऊ नये. त्याचे वय काय होते? आपण सर्वांनी त्यांची एनर्जी पाहिली. त्यांचे विमान पडल्याचा फोन आल्यानंतर आजही अंगावर काटा येतो. अनेकदा दादा खरेच गेलाय का? असा प्रश्न पडतो.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी महिला आरक्षणाचे विधेयक 2023 मध्येच पारित झाल्याचेही यावेळी ठणकावून सांगितले. त्या म्हणाल्या, 21 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत एकमताने महिला आरक्षणाचे बिल पास झाले आहे. त्यामुळे 2024 मध्येही त्याची अंमलबजावणी होऊ शकत होती. राहुल गांधींसह सर्वच विरोधी पक्षनेत्यांनी सध्या 543 जागांमध्येच महिलांना 33 टक्के द्या असे सांगितले. या प्रकरणी सर्वांची रात्रभर बसण्याची तयारी होती. पण सरकारने तसे केले नाही.

महिला आरक्षणाचे बिल 2023 मध्ये पारित झाले. ते तेव्हापासून तसेच पडून आहे. त्याची अंमलबजावणी आतापर्यंत का केली नाही. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये आजही 40-50 टक्के खासदार महिला आहेत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कुठेही आणि केव्हाही चर्चेला बोलवावे, आम्ही तिथे जाऊन आमची बाजू मांडू. त्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा. दिल्लीत भाजपने प्रथम आम्हाला कोणती माहिती दिली आणि नंतर प्रत्यक्ष विधेयकात किती तफावत होती याची संपूर्ण क्रोनॉलॉजी पुढे आली पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप...

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी...

खरात ची वरात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधून रुग्णालयाकडे

अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास;...