महिला आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी खुली चर्चा करा:सुषमा अंधारे यांचे जाहीर आव्हान

Date:

पुणे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महिला आरक्षण विधेयकाबाबत केवळ भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना या विषयावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान दिले. यावेळी शहराध्यक्ष गजानन थरकुडे आणि प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत उपस्थित होते.

अंधारे यांनी भाजपवर महिलांना राजकारणात स्वतःहून संधी न दिल्याचा आरोप केला. त्यांनी भाजपला आव्हान दिले की, त्यांनी त्यांच्या पक्षातील एखाद्या महिलेला मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष करून दाखवावे. महिला धोरणाचे पुरस्कर्ते असल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री असतील, तर त्यांनी महिला विधेयकावर आपल्याशी जाहीर चर्चा करावी, असे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांच्यासह आपणही मुख्यमंत्र्यांशी जाहीर चर्चा करण्यास तयार असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत भूमिका मांडताना, त्यास विरोध झाल्याचा आरोप केला होता. मात्र, 20 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनीच एक ट्विट करून महिला आरक्षणाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे सांगितले होते. याच दिवशी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्याचे चुकीच्या पद्धतीने सांगितले होते, असे अंधारे यांनी निदर्शनास आणून दिले.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, महिला विधेयकाची ‘भ्रूण हत्या’ झाल्याचे मुख्यमंत्री सांगत असतील, तर 1951 साली हिंदू कोड बिल मांडले गेले, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहानुभूतीदार श्यामप्रसाद मुखर्जी आणि मदनमोहन मालवीय यांनी त्यास विरोध केला होता, अशी आठवण अंधारे यांनी करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या बिलाची हत्या या दोघांनी केली होती, याबाबत भाजपने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

महात्मा फुले वाडा संस्थेला देण्याचा घाट घातला?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, महात्मा फुले वाडा विकसित करण्यासाठी राज्य सरकारने एका स्वयंसेवी संस्थेला देण्याचा घाट घातला होता, असा आरोपही अंधारे यांनी केला. मुख्यमंत्र्यांना फुले यांचे नाव घ्यायचे असेल, तर त्यांनी फुले यांचे ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्यांचे आसूड’ ही पुस्तके संघाच्या वार्षिक शिबिरात जाहीरपणे वाचायला लावावीत, असे आव्हान त्यांनी दिले.

उत्तर-दक्षिण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

सुषमा अंधारे म्हणाल्या की, सन 2011 च्या जनगणनेच्या आधारावर महिला विधेयक का मांडले, याचे उत्तर सरकार देत नाही, असे अंधारे म्हणाल्या. केंद्र सरकार दक्षिण भारतातील राज्यांची मतदारसंघ पुनर्रचनेत गळचेपी करत आहे. भाजप लोकसंख्या वाढीवर आधारित मतदारसंघ पुनर्रचनेनुसार लोकप्रतिनिधी ठरवण्याबाबत उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१८२२ वीजचोरांना महावितरणचा दणका; ६.१५ कोटींचा दंड,२५लाख ८९ हजार युनिट वीजचोरी उघड

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने धडक मोहीम सुरू ठेवली असून, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांत पुणे परिमंडलातील पुणे ग्रामीण, गणेशखिंड शहर आणि रास्तापेठ शहर मंडलात १८२२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांनी २५ लाख ८९ हजार ९५० युनिट वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या सर्व वीजचोरांना ६ कोटी १५ लाखांचा दंड महावितरणने ठोठावल्याने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करून अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येते. मोठ्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चाकण एमआयडीसी उपविभागातील ‘व्यंकटेश इंडस्ट्रीजने (न्यू मल्हार इंडस्ट्रीज)’ ७४९२२ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यास १६ लाख १६ हजार रुपये तर चाकणमधीलच ‘संत कृपा एंटरप्रायझेसला’ ३८६६८ युनिटसाठी १५ लाख २२ हजारांचा दंड आकारण्यात आला. हडपसर औद्योगिक उपविभागातील ‘द चेअरमन पार्क इन्फिनिया’ येथे ४७८६७ युनिट वीजचोरीसाठी १६ लाख २९ हजार रुपये, गणेशखिंड उपविभागातील ‘मिहिर एंटरप्रायझेस’ला  ४७२९० युनिटसाठी १३ लाख ५२ हजार रुपये दंडाची आकारणी झाली. मंचर उपविभागातील ‘नवनाथ रंगनाथ बांगर’ या ग्राहकाने ३८४६८ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ग्राहकाला ४ लाख १९ हजार रुपयांचा दंड लावला आहे. राजगुरुनगर उपविभागातील ‘भाग्यश्री राजेंद्र भालेराव’ या ग्राहकाला ३३३२१ युनिटसाठी ८ लाख ३ हजार रुपये, हडपसर उपविभागातील ‘माधुरी दिनेश शिवरकर’ ला ३२७१० युनिटसाठी ३ लाख ७३ हजार रुपये आणि ‘दिनेश मारुती शिवरकर’ ग्राहकाकडे १८४४० युनिट वीजचोरी आढळून आल्याने त्यास ४ लाख ३२ हजार रुपये, ‘मिनिनाथ मारुती सावंत’ यास २४७९१ युनिटसाठी २ लाख ६८ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. याशिवाय औंध उपविभागातील ‘अक्षय विश्वनाथ निकाळजे’ ग्राहकाची २१५८३ युनिट वीजचोरी सापडली त्यांना २ लाख ४९ हजार रुपये दंडाचा फटका बसला. महावितरणचे आवाहन वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वीजचोरीच्या प्रकरणात दंडासोबतच कारावासाचीही तरतूद वीज कायद्यात आहे. तसेच, वीजचोरी करताना जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

विद्यानंद बापट मारहाण प्रकरणाचे राजकीय पडसाद; सत्ताधारी-विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया

संतोष चव्हाणला अटक; एकनाथ शिंदेंचे संयमाचे आवाहन, सुप्रिया सुळे-यशोमती...

‘या झुंडशाहीची दहशत वेळीच मोडून काढा’; विद्यानंद बापट मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मतभेद असू...

स्पीकरला विरोध केल्याने आता बापटांना फटके लगावले- महापालिकेतील सभागृहानंतर आता रस्त्यावर दादागिरी

पुण्यातील टिळक रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना...