प. महाराष्ट्रात 21 ते 23 दरम्यान वादळी पावसाचा इशारा
नाशिक: राज्यात निसर्गाचा लपंडाव सुरू आहे. एका बाजूला विदर्भातील काही भागांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला तर दुसरीकडे प. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी अमरावतीत राज्यातील सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील २४ जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
सोमवारी अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात किंचित घट झाली. सध्या उत्तर ते दक्षिणेत उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे विदर्भातील जिल्ह्यांना थेट झळा बसत आहेत. विदर्भात २१ तारखेला उष्ण रात्रीची स्थिती निर्माण होऊ शकते. २२ ते २४ एप्रिलदरम्यान तेथील हवामान कोरडे राहून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत आकाशात विजा कडाडत होत्या.

