उष्णतेच्या तडाख्यात अचानक बदलाचा इशारा
पुणे- भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) २० एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा गडगडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पुढील तीन तासांत पावसाची शक्यता असल्याने केंद्रीय मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना टेस्ट मेसेज पाठवण्यात आले आहेत.
रविवारी (१९ एप्रिल) दुपारी उकाडा वाढल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अचानक पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. सोमवारी सकाळपर्यंत सांगली, धाराशिव, नांदेड, हिंगोली, वाशीम, बुलडाणा, अकोला आदी जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून वाढलेल्या उन्हाच्या झळांनी जनजीवन काहिल झाले असताना, या अनपेक्षित पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला.
मुंबई-पुणे अलर्ट! पुढील काही तासांत वादळी पाऊस, विजांचा कडकडाट
Date:

