पुणे – पुणे महापालिकेच्या कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १०, ११, ३१ मधील सर्व आरोग्य कोठीच्या अंतर्गत ई-कचरा जमा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये २ हजार ९६७ किलो ई-कचरा गोळा केला. डहाणूकर कॉलनी सर्कल, मयूर कॉलनी, रामबाग कॉलनी, सुतारदरा, मोरे विद्यालय, कोथरुड गावठाण, परमहंस नगर, भुसारी कॉलनी, गाढवे कॉलनी, गुजरात कॉलनी इत्यादी परिसरात १० ठिकाणी ई-कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. या संकलन केंद्रावर नागरिकांनी आपल्या घरातील ई-कचरा, जून कपडे,चपला, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, बंद पडलेले मोबाईल,चार्जर, वायर, ओव्हन, घड्याळे, हिटर, जुने पुस्तके, वह्या, प्लास्टिक वस्तू व खेळणी अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचे संकलन करण्यात आले.
सर्व केंद्रावरील एकूण २८९ नागरिकांनी आपल्या घरातील ई-कचरा जमा करून उदंड प्रतिसाद दिला. सर्व संकलन केंद्रावर १० लॅपटॉप, ५ टीव्ही संच, ७ संगणक, ६५ किलो चार्जर व ५८० किलो जून कपडे, २०७ किलो चपला व बुट, ३९० किलो प्लास्टिक व खेळणी १८० किलो रद्दी, ५८५ किलो टीव्ही व संगणक, १४० किलो जुने रेडिओ व घड्याळे, ३२० जुने गिझर, ३७० जुने भांडी, १३० किलो जुने मोबाईल असे एकूण २ हजार ९६७ किलो ई-कचरा गोळा करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अविनाश सकपाळ, परिमंडळ कार्यालय क्रमांक २ चे उपायुक्त संतोष वारुळे, महापालिका साहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण कुंभार, किरण जाधव, राजेश आहेर, दत्तात्रय दळवी, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, गणेश चौधरी, लक्ष्मीकांत कुलकर्णी, सचिन सावंत, निसार शेख, जया सांगडे, वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, परेश कुचेकर, कुणाल जाधव यांनी या मोहिमेसाठी परिश्रम घेतले.

