कौशल्याच्या संधी: रोजगाराच्या हमी

Date:

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यास्तव ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक ठिकाणी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देणे, रोजगार व उद्योजकता वाढवणे, स्थानीय उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत कौशल्य विकासाचे उमेदवारांना ३ ते ६ महिन्याचे अल्प मुदतीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये डिजीटल मित्र, मेडीकल रेकार्ड असिटंट, इलेक्ट्रेशियन, जुनियर ज्वलेरी डिझायनर, वेब डेव्हलव्पर, सोशियल मिडीया इन्फ्लयूंसर आदीबाबत प्रशिक्षण देण्यात येते.

या प्रशिक्षणाकरिता उमेदवारांचे शैक्षणिक पात्र १० वी १२ वी, पदविका, पदवी (प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय वेगवेगळी असेल). १८ ते ४५ युवक-युवतींसाठी वयोगटातील उमेदवार असावे. आधारकार्ड, शैक्षणिक पात्रतेनुसार प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शासनामार्फत प्रमाणपत्र देण्यात येते तसेच व्यवसाय करण्यासाठी उमेदवारांना प्रमाणपत्राच्या बँकेकडून कर्ज मिळते. कौशल्य विकास प्रशिक्षण संबंधित सर्व बाबी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध आहेत, तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क साधावा.

प्रशिक्षणामुळे बदललेले अक्षदाचे जीवन

ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे ही आजच्या काळातील अत्यंत गरजेची बाब आहे. आर्थिक अडचणी, अपुरी कौशल्ये आणि मर्यादित संधी यामुळे अनेक तरुणांना आपल्या क्षमतेनुसार प्रगती करता येत नाही. अशा परिस्थितीत शासनाच्या विविध कौशल्य विकास योजनांमुळे ग्रामीण युवकांना नवे आयाम मिळत आहेत. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही योजना त्यापैकी एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून, मोफत प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्याचे काम करते. या योजनेचा लाभ घेत आळेफाटा येथील अक्षदा प्रितम मोढवे हिने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला असून तिची यशोगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आळेफाटा येथील अक्षदा प्रितम मोढवे हिच्या जीवनात प्रशिक्षणापूर्वी विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याचे पतीही पेट्रोल पंपांवर मजुर म्हणून काम करीत होते. त्यामुळे उत्पन्न मर्यादित असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखिची होती, कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ते धडपड होते. अशातच प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राअंतर्गत आस्था फाउंडेशनमार्फत जनरल ड्युटी असिस्टंट (जीडीए) अभ्यापसक्रमासाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात तिला मूलभूत नर्सिंग कौशल्ये, रुग्णांची काळजी, रुग्णालयीन शिस्त, कक्षाचे व्यवस्थापनाचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्यानंतर आस्था फाउंडेशनने तिला सिग्मा कर्करोग रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. तिची मेहनत आणि चिकाटीने ती लवकरच कामामध्ये स्थिरावली.

प्रशिक्षणाने तिच्या आयुष्यात परिवर्तन होण्यास सुरुवात झाली, सहा महिने होताच तिची परिस्थिती सुधारु लागली.आज तिला महिन्याला १५ रुपये पगार मिळतो आणि तिचे पतीही पुणे शहरात टॅक्सी चालवून ते आपल्या कुटुंबाचे सक्षमपणे उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच सद्या मोढवे ही जीएनएम अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करीत जाहे.

सुरेश वराडे, सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे माध्यमातून जिल्हा कार्यालयामार्फत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कार्य प्रशिक्षण योजना जसे की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण व प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना व रोजगार मेळावे या योजना निशुल्क राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षण, कार्य प्रशिक्षण व रोजगार मेळावे या विविध योजनांचा लाभ घ्यावा.

अक्षदा प्रितम मोढवे : जीडीए प्रशिक्षणामुळे माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. मी आज स्वतंत्रपणे काम करीत असून माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. माझे कुटुंब सुरक्षित आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राअंतर्गत आस्था फाउंडेशनने दिलेल्या संधीमुळे आमचे आयुष्य खरोखर बदलले आहे.

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण, आरोग्यविषयक विविध योजनांच्या...

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात:सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...

महिला आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी खुली चर्चा करा:सुषमा अंधारे यांचे जाहीर आव्हान

पुणे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी...