मौन पाळत हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन.
मुंबई दि.३०: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले आहे. यावेळी, आमदार अभिमन्यू पवार, विधीमंडळ सचिव-१ श्री जितेंद्र भोळे, मुख्य सुरक्षा अधिकारी श्री. प्रदीप चव्हाण यांसह विधीमंडळ अधिकारी व कर्मचारी वर्गाने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
तत्पुर्वी, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधीमंडळ सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मौन पाळत हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
गांधीजींच्या सत्याग्रह, दांडी यात्रा यांमधून जगभरातील लोकांनी प्रेरणा घेतली आहे. महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानाचा देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे कायमच आदर करत आले आहेत. सर्वांनी स्वच्छता व श्रमसंस्काराच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या स्मृतीस अभिवादन करावे असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.