भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन

Date:

पुणे, दि. ७ : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून, त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहानिमित्त संविधानाविषयी जनजागृती, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, ग्रामीण शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे प्रबोधन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे तसेच शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री. विशाल लोंढे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदी-शाहांची भाषा बघा मग बोला: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर २६. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून...

पुण्याच्या जलव्यवस्थापनासाठी फिनलंडच्या प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेण्याच्या हालचाली!

महापौर मंजुषा नागपुरेंच्या पुढाकारातून पुणे–फिनलंड सहकार्याला चालना; सांडपाणी पुनर्वापर,...

अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन : डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्रीवाद एकाच आवाजाचा नाही; स्त्रियांच्या विविध अनुभवांतून त्याची व्याप्ती...

पुण्यात धावत्या इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला!

स्वारगेटजवळील सेव्हन लव्ह्ज चौकात थरार; सर्व प्रवासी सुखरूप, अग्निशमन...