भाजपा वर्धापनदिनानिमित्त सेवा सप्ताहात वैकुंठ स्मशानभूमी सह विविध संस्थांना साहित्य वाटप – संदीप खर्डेकर.

Date:

दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमची ऊर्जा – मंजुश्री खर्डेकर.

पुणे-वैकुंठ स्मशानभूमीत काही स्नेह्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो असता तेथे श्रद्धांजली अर्पण करताना तेथील स्पीकर नादुरुस्त असल्याने मान्यवरांना त्यांच्या भावना व्यक्त करताना अडचण होतं असल्याचे लक्षात आले.त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या  ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे वैकुंठ विद्युतदाहिनी येथे स्पीकर सेट भेट देण्यात आल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले. तसेच उमेद फाउंडेशन च्या दारवली येथील बालक पालक प्रकल्पास २५ खुर्च्या भेट देण्यात आल्या, संस्थेच्या वतीने राकेश सणस यांनी त्या स्वीकारल्या तर सेवाव्रत फाउंडेशन चे प्रदीप देवकुळे यांच्या पुढाकाराने मावळे आळी,गोसावी वस्ती येथील “वृंदावन शैक्षणिक व सर्वांगीण विकास प्रकल्पास” सतरंज्या भेट देण्यात आल्या.

यावेळी फाउंडेशन च्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश कालेकर,उप अभियंता विद्युत जयदीप अडसूळ,विद्युतदाहिनी तील कर्मचारी कुंदन शिंदे,अनुप भातंबरेकर,श्रीनिवास कोटा,अमोल आवळे, अक्षय अवचरे,इ उपस्थित होते.सर्वच ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही त्यामुळे सामाजिक संस्थांनी सण, उत्सव साजरे करताना त्यातील काही रक्कम ही लोकोपयोगी साहित्य वाटपासाठी राखून ठेवली तर त्याचा सदुपयोग होईल असेही संदीप खर्डेकर म्हणाले.

फाउंडेशन च्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमची ऊर्जा असून, त्यातूनच अधिकाधिक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याची प्रेरणा मिळते. या सेवा सप्ताहात विविध संस्थांना उपयुक्त वस्तूंची मदत देऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचा ४६ वा वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करत आहोत असेही मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश कालेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व विविध संस्था व वैकुंठ परिवार करत असलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

विद्युतदाहिनीतील कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांना आम्ही त्वरित हा स्पीकर उपलब्ध करून देऊ व याची योग्य निगा राखू असे सांगितले. स्पीकर सेट सह दोन कॉर्डलेस माईक व एक चार्जिंग वायर सह माईक, रिमोट, ब्लु टूथ इ सुविधा असल्यामुळे त्याचा वापर सुलभ होईल असेही मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...