पुणे:पर्वती विधानसभा मतदारसंघात स्व. नानासाहेब वाबळे ट्रस्टच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी आमदार माधुरीताई मिसाळ या उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिक वितरण केले. युवा क्रिकेकटपटुंना व्यासपीठ निर्माण करुन देण्यात अशा स्पर्धा महत्त्वाची जबाबदारी निभावत असतात, त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनासाठी संयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.असे आमदार मिसाळ यांनी म्हटले आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक डी डी स्पॉट्स , द्वितीय क्रमांक अभिजित दादा गोफण, तृतीय क्रमांक धनविन स्पॉट्स, चतुर्थ क्रमांक श्री ११ या संघांनी पटकावला. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक महेश वाबळे यांच्यासह विकी कांबळे, आकाश काळे, उत्कर्ष मोरे, सनी पाटोळे, शुभम चव्हाण, कुणाल कांबळे, दत्ता मोरे यांनी केले. या स्पर्धेत एकूण ४० संघानी भाग घेतला होता.
या वेळी मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत दिवेकर, सरचिटणीस प्रशांत थोपटे, कैलास मोरे,औदुंबर कांबळे ,लहुशेठ जागडे , बिपीन पोतनीस,धमा ढावरे,प्रभागातील नागरिक, खेळाडू तसेच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.