- २८ ते ३१ जानेवारी दरम्यान स्पर्धेचे आयोजन
- विजेत्या संघाला रोख पारितोषिक
पुणे : शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै. शंकरराव ढमाले स्मृती निमित्ताने आठव्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन २८ ते ३१ जानेवारी दरम्यान बाजीराव रोड येथील नातूबाग मैदान येथे करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धा आयोजक संजय नाईक, उमेश गालिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली.
स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक विशाल धनवडे, माजी नगरसेवक धीरज घाटे, माजी नगरसेवक पृथ्वीराज शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत मुलांचे ६४ व मुलींचे २४ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत पुरुष व महिला गटांच्या विजेत्यांना ३१,००० हजार, उपविजेत्या संघाला २१,०००, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघाला १५,००० हजार आणि चतुर्थ क्रमांक १५,००० हजार रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच रोजचा उत्कृष्ट खेळाडू पुरुष आणि महिला, रोजचा मॅन ऑफ द डे, अष्टपैलू, उत्कृष्ट चडाई, उत्कृष्ट पकड यांना देखील रोख पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक उमेश गालिंदे यांनी दिली.