एमआयटीत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा
पुणे, दि. २७ जानेवारी: ‘व्यायाम आणि कृतज्ञता’ प्रत्येकाने अंगी बाणवले पाहिजे. येणार्या प्रत्येक संकटाचा सामना भयमुक्त होऊन करावा. असे विचार एएफएमसी, पुणेचे संचालक लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल SM, VSM यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे ७५वा प्रजासत्ताक दिन कोथरूड कॅम्पस येथे साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल, श्रीमती सुमेधा कोतवाल व एमआयटी वर्ल्ड पीस युुनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा.शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव गणेश पोकळे व माईर अंतर्गत असलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. मयुर पवार व तन्मय आर्य या माजी एनसीसीच्या कॅडेट्सचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती पर कार्यक्रम सादर केले. तसेच एनसीसीच्या कॅडेट ने सादार केलेल्या परेड ने सर्वांना आकर्षित केले. तसेच, सर्वांना स्वातंत्र्य रक्षणाची शपथ देण्यात आली.
लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल म्हणाले, निःस्वार्थ सेवाभाव, सर्वांप्रती प्रेम भावना ठेऊन आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडावे. स्वतः कमी न लेखता आपली दुसर्याशी तुलना करू नये. धर्म आणि कर्म ही दोन तत्त्वे आत्मसात करावीत.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, भारतमातेसाठी समर्पित भावना जागविण्याचा हा दिवस आहे. शिस्त, चारित्र्य आणि समर्पण या गोष्टीच्या आधारे प्रत्येकाने देशसेवा करावी. तसेच, माता पिता आणि देशसेवेचे कर्तव्य बजावावे. भारताजवळ विश्वगुरू बनण्याबरोबरच जगाला सुख, शांती आणि समाधान देण्याची शक्ती आहे.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्तावना मांडली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.