पुणे- बंबल ऑनलाईन डेटिंग अॅपवरून चक्क आयकर आयुक्त भेटला,त्याने गोल्ड बॉन्ड, सरकरी नौकरीच्या नियुक्तीचे पत्रही दिले आणि मग काय… काही दिवास्त तो गायब झाला , ना फोन लागला , ना त्याच्या पत्त्यावर सापडला …नंतर मुलीच्या लक्षात आले ..आपले ४० लाख घेऊन आणि लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून तो फरार झाला..पोलिसात तिने धाडसाने तक्रार दिली आणि पुणे पोलिसांनीही या भामट्याचा शोध सातत्याने जारी ठेवत त्याला दिल्लीत शोधून बेड्या ठोकल्या.आजकाल मुलींच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यांना थकविणारा हा भामटा सराईत निघाला
पुणे पोलिसांनी यासंदर्भात सांगितले कि,’सदर गुन्हयातील आरोपी नामे गौरव दिग्विजयसिंह पांडे, वय २८ वर्षे, राह. बी/६८, न्यु फ्रेडंस कॉलनी, नवी दिल्ली याने बंबल ऑनलाईन डेंटिंग अॅपवरून गुन्हयातील फिर्यादी यांचेशी ओळख निर्माण करून तो दिल्ली येथे इन्कम टॅक्स रेड कमिशनर असल्याचे खोटे सांगून, त्यांना लग्नाचे आमिष दाखवून, त्यांचेवर अत्याचार करून, त्याचा मोबाईल फोन बंद करून तो फरार झाला होता. सदरबाबत दिनांक ०१/११/२०२३ रोजी बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे येथे गु. रजि.नं. ३३९/२०२३ भा.द.वि. कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गौरव पांडे याचे शोधार्थ तांत्रिकरित्या तपास केला असता तो नवी दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यात शासकीय आधिकारी म्हणुन आपली ओळख सांगुन राहत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार कुसाळकर व सरक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे जावून शोध घेवून त्याला वर नमुद गुन्ह्यात अटक केली आहे. अटक आरोपी गौरव दिग्विजयसिंह पांडे, वय २८ वर्षे, रा. बी/६८, न्यु फ्रेडंस कॉलनी, नवी दिल्ली याने सिहंगड पोलीस ठाणे हददीत राहणारे तक्रारदार यांनाही तो नवी दिल्ली येथे इन्कम टॅक्स कमिशनर असल्याने त्याची शासकीय उच्चअधिकारी यांचेसोबत ओळख असल्याचे सांगुन तक्रारदार यांना आर.बी.आय. बँकेचे बनावट गोल्ड बॉन्ड देवून तसेच त्यांचे मुलीस बनावट सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र देवून त्यांची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याने त्याचेविरूध्द सिहंगड पोलीस ठाणे गु.रजि.नं. ०५/२०२४, भादंवि कलम ४०६,४२० अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपीने फरासखाना पो.स्टे. पुणे हद्दीमधील तक्रारदार यांची फसवणूक केलेबाबत तक्रार प्राप्त असून अशा प्रकारची अन्य कोणाची फसवणूक झाली असल्याने त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा.
सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील,स उप आयुक्त, परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, , सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर , संजय सुर्वे, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे व.पो. नि. श्री. संदिपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, महिला पोलीस उपनिरीक्षक, वैशाली तांगडे, सफौ. मोहन काळे, पोलीस अमंलदार अनिल कुसाळकर, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञाना बडे, विशाल मोहिते यांचे पथकाने केली.