पुणे – एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेचे स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स अँड रिसर्चतर्फे नुकतीच बायोइंजिनियरिंगमधील अलीकडील ट्रेंड्स (ICRTB2024) या विषयावर ७वी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेच्या निमित्ताने जागतिक तज्ञ, संशोधक आणि विद्वान मंडळी बायोइंजिनियरिंगमधील नवीनतम प्रगती जाणून घेण्यासाठी एकत्र आले होते.
या परिषदेत बायोसेन्सर्स, जैव-प्रेरित साहित्य, बायोमेडिकल इमेजिंग, वैद्यकीय रोबोटिक्स, क्लिनिकल डायग्नोस्टिक्ससाठी बायोमटेरियल्स, पर्यावरण निरीक्षण, नॅनोमटेरिअल्स, ड्रग डिलिव्हरी सिस्टम, बायोमटेरिअल्स, जैव खते आणि जैव कीटकनाशके, बायोरिमेडिएशन, वैद्यकीय आणि परिधान करण्यायोग्य उपकरणे यासह विविध थीम्सचा समावेश करण्यात आला होता.
आयआयएसईआर पुणेचे संचालक प्रा. सुनील भागवत, प्रा. जेरेमी सिम्पसन, यूसीडी कॉलेज, डब्लिन आयर्लंड, डॉ. कर्स्टन रोसेलॉट, प्रा. सायमन वांग, डॉ. जस्टिन डौवेल्स, डॉ. सायमन हैदर आणि डॉ. नताली आर्टझी यांसारख्या जगाच्या विविध भागांतील प्रमुख वक्तांनी या परिषदेला हजेरी लावली.
परिषदेला मौखिक आणि पोस्टर प्रेझेंटेशनसाठी १०० हून अधिक शोधनिबंध व प्रकल्प प्राप्त झाले. त्यामुळे ही परिषद सर्वच स्थरांवर अत्यंत यशस्वी ठरली.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेबद्दल स्कुल ऑफ बायोइंजिनियरिंगचे संस्थापक संचालक प्रा. विनायक घैसास व प्राचार्य डॉ. रेणू व्यास तसेच कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.