विश्वशांतीसाठी व कल्याणासाठी सामुदायिक रामरक्षा पठण ग्रंथ पारायण दिंडी

Date:

आधार सोशल फाऊंडेशन, चौफेर प्रतिष्ठान व उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सलग ९ रविवार आयोजन
पुणे : विश्वशांती व भारतीयांच्या कल्याणासाठी तसेच अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंत्रा (रामरक्षा स्तोत्र) द्वारे पाठबळ देण्यासाठी सामुदायिक रामरक्षा पठणाचे आयोजन तुळशीबाग राममंदिरात सलग ९ रविवार करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी सामुदायिकरीत्या स्तोत्राचे पठण केले. मंत्र व राम नामाच्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला.
ग्रंथ पारायण दिंडी, आधार सोशल फाऊंडेशन, चौफेर प्रतिष्ठान व उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तुळशीबाग राम मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रंथ पारायण दिंडीचे विरेंद्र कुंटे, आधार सोशल फाऊंडेशनचे दिलीप काळोखे, चौफरे प्रतिष्ठानच्या वृंदा जोशी, उत्कर्ष महिला मंडळाच्या सविता काळोखे, यांसह श्रीरामजी संस्थान तुळशीबागचे विश्वस्त उपस्थित होते. 
विरेंद्र कुंटे म्हणाले, श्री रामरक्षेच्या पठणाचे अद्भुत परिणाम सर्वांना ज्ञात आहेत. विश्वशांती व जनतेच्या कल्याणासाठी तसेच प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंत्रा (रामरक्षा स्तोत्र) द्वारे पाठबळ मिळावे, यासाठी हा संकल्प करण्यात आला. दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक रविवारी (एकूण ९ रविवार) सामुहिक रामरक्षा स्तोत्र, भिमरुपी स्तोत्र पठण व रामनामाचा जप करण्यात आला, असे ही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस,...

महाराष्ट्रात २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान ‘सहकार सप्ताह’चे आयोजन

▪️ 'सहकार से समृद्धी' संकल्पनेच्या धर्तीवर राज्यभर विविध उपक्रमांचे...

नसरापूर खटला:आरोपी भीमराव कांबळे दोषी, कोर्ट 29 जूनला सुनावणार अंतिम शिक्षा

पुणे- भोर तालुक्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात...