माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांना जाधवर इन्स्टिटयूटस तर्फे जीवनगौरव पुरस्कार

Date:

संस्थेचा १३ वा वर्धापन दिन ; पद्मश्री राहीबाई पोपेरे, औदुंबर उकिरडे, मिलिंद शिंदे, निलेश ढमढेरे, जयंत हिरे पुरस्काराचे मानकरी
पुणे : शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् च्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार माजी खासदार, समाजसेवक प्रा. जोगेंद्र कवाडे यांना शनिवार, दिनांक २४ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल १, मानाजीनगर, न-हे येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन्मान सोहळ्यांतर्गत पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना कृषी क्षेत्रातील पुरस्कार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, सिने अभिनेता मिलिंद शिंदे यांना कला क्षेत्रातील पुरस्कार, पुणे अर्बन को-आॅप बँकेचे अध्यक्ष निलेश ढमढेरे यांना सहकार क्षेत्रातील पुरस्कार आणि समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टचे जयंत हिरे यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कला यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक विजय बाविस्कर हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जाधवर परिवारात असलेल्या पंचवीस हजार विद्यार्थी व पालक आणि दीड हजारपेक्षा जास्त कर्मचा-यांना प्रेरणा मिळावी, याउद्देशाने सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, सैन्यदल आणि रुग्णवाहिका चालकांच्या मुलांना केजी ते पीजी पर्यंतच्या शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत देण्यात येते. तसेच ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश घेतल्यास शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत शिष्यवृत्तीच्या रुपात दिली जाते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरु असतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवरायांचा अवमान सहन करणार नाही: मुरलीधर मोहोळांविरोधात रुपाली पाटील ठोंबरे आक्रमक!

विजयादशमीच्या बॅनरवरून भाजपला इशारा, महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला...

पुण्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; काँग्रेसचा महापालिकेला ४८ तासांचा अल्टिमेटम!

‘फवारणी कागदावरच, पुणेकरांचे आरोग्य धोक्यात’; तातडीने स्वच्छता, मोफत तपासण्या...

PMPML बसमध्ये विसरलेली प्रवाशाची पिशवी सुखरूप परत; आगारप्रमुख सुनील दिवाणजी यांच्या तत्परतेचे कौतुक!

तिकिटाच्या आधारे संबंधित वाहकांशी तातडीने संपर्क; प्रवासी अभिनंदन कासार...

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचार

मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत मतदारांना मतदानाचे आवाहन भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी...