विद्यार्थ्यांकडून पूजन : संयुक्त स्त्री संस्थेच्या शाळेचा उपक्रम.
पुणे – कोरोनानंतर आपल्या समाजात आरोग्य विषयीची काळजी आणि त्याबाबत काही घेण्याची खबरदारी याबाबत चांगली जागृती झाली आहे. समाजातील प्रत्येक जण आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नव्हे तर मानसिक भावनिक आणि सामाजिक आरोग्याचाही त्यात अंतर्भाव होतो असे सर्व समावेशक आरोग्य चांगले राखणे म्हणजे निरोगी आरोग्य आहे. असा निरोगी आरोग्याचा मंत्र नवदुर्गांनी आज विद्यार्थ्यांना दिला.
शारदीय नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर केला जातो. हे औचित्य साधून संयुक्त स्त्री संस्थेच्या वतीने समाजातील आदीशक्ती असलेल्या नवदुर्गा पूजनाचा कार्यक्रम आयोजत करण्यात येतो. या निमित्ताने नविन पिढीला समाजातातूल कर्तृत्वंवान महिलांची आणि आपल्या परंपरांची ओळख करून देण्यासाठी हा कार्यक्रम गेली १४ वर्षे शाळेत करण्यात येत आहे.
यंदा समाजातील डॉअश्विनी जोशी, डॉ. लीना भोंडे, मानसी भागवत ( समुपदेशक ), डॉ तेजस्विनी भाले (आयुर्वेदिक चिकित्सक )डॉ वैजयंती काळे, मधुवंती वैद्य (रेकी), डॉ माणिक आगाशे ( फिजीओथेरपीस्ट), नमिता जोशी ( हस्ताक्षर तज्ञ समुपदेशक ), वेदाली इनामदार ( स्पीच थेरपी ), अश्विनी नवाथे ( म्युझिक थेरपी ) या नवदुर्गांचा शारदीय नवरात्राचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हळक कुंकू, अत्तर लावले, प्रसाद दिला. हातावर स्वस्तिक काढले. त्यानंतर त्यांना तांब्याचा कलश, त्यावर आंब्याच्या पानांवर श्रीफळ व त्यावर गरजा ठेवलेला मंगल कलश देऊन त्यांचे पूजन केले. अध्यक्षा नीता रजपूत, सचिव मधुरा जोगळेकर, साधना अबिके आणि त्यांच्या सहकारी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी नव दुर्गाना प्रश्न विचारून बोलते केले.
व्यक्ती तितक्या प्रकृती अशी आपल्याकडे म्हण आहे ती खरी आहे कारण प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे त्यामुळेच एकासारखा आजार दुसऱ्याला झाला तरी त्यावर करायची उपचार पद्धती बदल करावे लागतात. त्यामुळे केवळ औषधोपचार सोडून आयुर्वेदिक उपचार, होमिओपॅथिक उपचार, म्युझिक थेरपी फिजीओथेरपी मानसोपचार अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती विकसित झालेल्या आहेत. आत्ताची ही विद्यार्थ्यांची पिढी खरंच भाग्यवान आहे कारण त्यांच्यासाठी बहुआयामी उपचार पद्धती उपलब्ध आहेत असे नवदुर्गानी सांगितले. समाजात विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांची, त्यांचा कामाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शारदीय नवरात्रात हा दुर्गा पूजनाचा उपक्रम गेली १४ वर्षे संस्थेत सुरू आहे. पुण्यातील पानशेत पूराच्या आपत्तीत मदतीसाठी त्यावेळी पुण्यातील महिलांच्या ५६ संस्था एकत्र आल्या होत्या. त्यांची संयुक्त स्त्री समिती स्थापन केली. त्यांनी मदत कार्यही केले. त्यानंतर ही समिती बरखास्त करू नका असे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व आयुक्त स. गो. बर्वे यांनी सांगितले. त्यातून संयुक्त स्त्री संस्थेची स्थापना ३१ मे १९६३ या दिवशी झाली. या संस्थेच्यावतीने गरीब मुलांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांची शाळा चालवल्या जातात. त्यात ६५० मुले शिक्षण घेत आहेत. याशिवाय पाच झोपडपट्ट्यांमध्ये बालवाड्या चालवल्या जातात.
अध्यक्षा नीता रजपूत यांच्यासह उद्योजिका नवदुर्गांनी दीपप्रज्वलन केले. सामुहिक श्रीसूक्त पठणानंतर पाहुण्यांचा व नवदुर्गांचा परिचय सुप्रिया सेनगुप्ता यांनी करून दिला.
प्रास्ताविकात डॉक्टर अलका पुराणिक यांनी सांगितले की, आपल्या घरात कुटुंबातही दुर्गा आहेत पण त्यांच्याकडे आपण कधी दुर्गा दुर्गेच्या रूपात बघत नाही. याची जाणीव विद्यार्थी तसेच मुलांना व्हावी यासाठी समाजातील नवदुर्गांचा सन्मान हा उपक्रम घेतला जातो. समाजात विविध क्षेत्रात काम करणा-या नव दुर्गांची आणि त्यांच्या कामाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने विद्यार्थीच्या हातून दुर्गाचे पूजन करण्यात येते. उपक्रमाचे हे १५ वे वर्ष आहे. या निमित्ताने आरोग्य क्षेत्रात महिला समाजात काय काम करत आहेत हे विद्यार्थ्यांना समजेल व त्यांना प्रोत्साहन मिळेल हा यामागचा उद्देश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुप्रिया सेनगुप्ता यांनी करून शेवटी अध्यक्षा निता रजपूत यांनी आभार मानले.

