पुणे : सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहातील राम मंदिरात श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त भव्य आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हिंदू आध्यात्मिक सेवा संघ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्र, महाराष्ट्र ब्राह्मण सभा पुणे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान यांच्यावतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
धार्मिक कार्यक्रमांसोबत शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक गुंदेचा, किशोर येनपुरे, अतुल व्यास, मकरंद माणकीकर, विश्वनाथ भालेराव, चिंतामणी क्षीरसागर, श्रीकांत नगरकर, कुंदनकुमार साठे आणि पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक मंडळ व सर्व शिक्षक उपस्थित होते.
सकाळी प्रभू श्रीरामांचे विधिवत पूजन आणि अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदार लवाटे यांनी ‘प्रभू राम मंदिर इतिहास पुणे विद्यार्थी गृह’ या विषयावर उपस्थितांना माहिती दिली. सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात आले होते.