पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम सेतूचा प्रारंभ असलेल्या अरिचल मुनईला भेट दिली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“प्रभू श्री रामांच्या जीवनात विशेष महत्त्व असलेल्या अरिचल मुनई येथे भेट देण्याची संधी मिळाली. हे राम सेतूचे प्रारंभ स्थान आहे.”
पंतप्रधानांनी धनुष्कोडी इथे कोदंडरामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धनुष्कोडी इथे कोदंडरामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.
हे मंदिर श्री कोदंडरामस्वामी यांच्या सेवेत समर्पित आहे. कोदंडराम म्हणजेच धनुर्धारी राम. हे मंदिर धनुष्कोडी इथे आहे. असे म्हटले जाते की या ठिकाणी विभीषण आणि श्री राम यांची पहिल्यांदा भेट झाली आणि त्यांनी रामाकडे आश्रय मागितला. काही आख्यायिकांमध्ये असेही म्हटले जाते की या ठिकाणी श्री राम यांनी विभिषणाचा राज्याभिषेक केला.
पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट केले आहे की:-
“कोदंडरामस्वामी मंदिरात प्रार्थना केली. धन्यतेची अनुभूती मिळाली.”