उद्याचे जग एआयवर नव्हे ज्ञानोबा – तुकोबांच्या मंत्रावर चालेल:विश्वास पाटील

Date:


३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचा समारोप समारंभ

पुणे, दि. ३० नोव्हेंबर: ” सध्याचे जग हे एआयचे बनत आहे. एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता महत्वाची असून उद्याचे जग हे एआय च्या तंत्रावर नव्हे ज्ञानोबा – तुकोबांच्या मंत्रावर चालेल.” असे विचार ज्येष्ठ लेखक आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी  एमकेसीएलचे वरिष्ठ सल्लागार व शास्त्रज्ञ डॉ. विवेक सावंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी विश्वशांतीच्या जीवन कार्यासाठी उपस्थित सर्वांच्या वतीने डॉ. विश्वनाथ कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  योगगुरू अनंत कोंडे व मारूती पाडेकर गुरूजी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पीस स्टडीज च्या वतीने ‘सेंटर फॉर एक्सेलेन्स इन संस्कृत अँड आयआरएस स्टडीज’ कोर्सच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

विश्वास पाटील म्हणाले, ” शिवाजी महाराजांना जिजाऊंनी विश्वशांतीची प्रेरणा दिली. त्यांच्यावर संतांच्या विचारांचा प्रभाव होता. शक्ती, युक्ती आणि भक्तीचा संगमातून स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्यातून मानवी जातीचे कल्याण केले. म्हणून शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ राजे झाले.”

डॉ. विवेक सावंत म्हणाले, ” विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामधील अद्वैत कल्पना ही आपली संतपरंपरा आहे. ती पुढे नेण्याचे काम डॉ. कराड सरांनी केले.आज  बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्थेची गरज असून त्यातूनच भारत आत्मनिर्भर होईल. विद्यार्थ्यांना स्व चा शोध घ्यायला शिकवा. स्व च्या शोधाच्या साधनेतून विश्वशांती प्राप्त होईल.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी या व्याख्यानमाला महत्वपूर्ण आहेत. ज्ञानोबा तुकोबा टाळकुट्यांचा विषय नाही, हे एक चांगले जीवन जगण्याचे सारं आहे. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी संतांचाच एकमेव मार्ग आहे.”

डॉ.आर. एम. चिटणीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युनिफाइड डीसीपीआर म्हणजे काय , घ्या समजून

युनिफाइड डीसीपीआर (UDCPR - Unified Development Control and Promotion...

शेतकऱ्यांची 48 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र...

मोशी दुर्घटनेप्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता निलंबित

नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर जबाबदारी निश्चित; विभागीय चौकशीचे आदेश, १५...

पुणे पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी

पुणे -पुण्यातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि स्टेशन...