Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोरोना काळात भारतात गैर व्यवस्थापनाचा कळस: डॉ. संग्राम पाटील

Date:

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दलाच्या वतीने दि.१९ जानेवारी रोजी   सायंकाळी ६ वाजता अभ्यासक डॉ.संग्राम पाटील (इंग्लंड)यांचे ‘कोरोना आणि मोदी सरकार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी भवन सभागृह,कोथरूड येथे झालेल्या या व्याख्यानालाडॉ कुमार सप्तर्षी,डॉ. उर्मिला सप्तर्षी, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर, मुकुंद बहाळकर,सुदर्शन चखाले , संदीप बर्वे,अंजुम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संग्राम पाटील म्हणाले, ‘ कोविड काळात  माणुसकीचे दर्शन भारतात घडले. या काळातील चुकांपासून धडे शिकले पाहिजे. आपण स्वतःला विश्व गुरू मानत असलो तरी शिकण्याची प्रवृत्ती सोडता कामा नये.
कोविडच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारत सरकार गंभीर नव्हते.बळींच्या आकडया बाबत भारत सरकार खोटे बोलत आहेत.५ लाख मृतांऐवजी ४०-५० लाख आकडा असणार आहे. आपण व्हॅक्सीन गुरु आहोत, असा चुकीचा प्रचार झाल्याने आपल्या कामगिरीवर आत्मपरीक्षण होत नाही. वैज्ञानिक मनोभूमिका नसल्याने छद्म विज्ञान प्रसारित केले जात होते.आयुर्वेद, युनानीचे उत्पादने , गाईचे शेण, मूत्र , आर्सेनिक यांना पुढे आणले गेले. ऑक्सीजन न मिळाल्याने रुग्ण दगावणे हे वैद्यकीय व्यवस्थेचे अपयश होते. डॉक्टर, नर्स यांनी चांगले काम केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल मंदिर उघडण्याचा दबाव आणत होते. कोविड चे नियम उल्लंघन सर्वात जास्त नरेंद्र मोदीनी केले. राज्यांना पैसे देण्यात केंद्र सरकार खळखळ करीत होते. कोवीडला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. थाळी वाजवणे,टाळया वाजवणे, गर्दी करणे असा उथळपणा फक्त भारतातच केला गेला.
कोरोना काळात रामलल्ला अस्थायी मंदिरात आणण्याचा किस्सा  राहुल सोलापूरकरांनी सांगितल्याचा संदर्भ देऊन टीका करताना डॉ. पाटील म्हणाले, ‘ मृत्यू तांडव सुरू असताना सत्ताधारी फक्त धार्मिक प्रसार,सभा, राजकारण, फोडाफोडी , उथळपणा, दुजाभाव असे सर्व प्रकार करत होते. शिवाय पीएम फंड सारखा खासगी निधी उभा करण्यात आला. खासदार देखील चोरून विमानातून रेमडेसीव्हर आणत होते.म्युकर मायकॉसिस फक्त भारतातच झाला. कारण स्टिरॉईडचा मारा करण्यात आला होता.

कोरोना काळात भारतात सर्वात जास्त गैर व्यवस्थापन झाले.याबद्दल कोणी बोलत नाही. माध्यमात लिहून येत नाही. सज्जनांचे मौन जास्त धोकादायक ठरले आहे. अजूनही अपयश लपवण्यासाठी बॅनरबाजी केली जात आहे.
शनिवार,दि.२० जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता माजी पोलीस अधिकारी विवेक देशपांडे यांचे ‘दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा’ विषयावर व्याख्यान होणार आहे. गांधी भवन सभागृह,कोथरूड येथे हे व्याख्यान होणार आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...