पुणे: शहरातील ज्येष्ठ नागरिक राजवंत सिंग( राजसिंग) पीडीएमबीए या संघटनेने ज्येष्ठ नागरिकांच्या 50 पेक्षा अधिक यावर होतात खेळण्यास मज्जाव केला हे दिनांक आठ जानेवारी रोजी या स्पर्धेत दुपारी चार वाजता जळवा घेऊन यास निघाले खेळाच्या ठिकाणी मैदानावर पोचताच त्यांना स्पर्धेत खेळण्यास मज्जाव करण्यात आला त्यांनी कारण विचारले असता त्यांना अपमानित करून बाहेर काढण्यात आले.या संदर्भात हवेली तालुका बडमिंटन असोसीएशनने किंवा पुणे जिल्हा महानगर बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आतापर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही .
राजसिंगहे हौशी खेळाडू आहेत. गेल्या 48 वर्षापासून त्यांना बॅडमिंटन खेळण्याचा छंद आहे.शीख हेल्पलाईन फाउंडेशनच्या माध्यमातून ते बॅडमिंटनच्या स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करतात अन स्वतःही देश विदेशात खेळतात. अत्यंत उत्साह आणि निरपेक्ष भावनेने ते या गोष्टी करीत असतात. त्यांनी नुकतीच ज्येष्ठ नागरिकांसाठी देशपातळीवरची स्पर्धा आयोजित केली होती. ती यशस्वी पार पडली. मी पुण्यातील हवेली तालुका बडमिंटन असोसीएशनने पीडीएमबीए (पुणे जिल्हा महानगर बॅडमिंटन संघटनेच्या) अधिपत्याखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये भाग घेतला.ते ८जानेवारी रोजी दुपारी ४वाजता पीयासी येथे सर्दीच्या ठिकाणी गेले परंतु त्यांना अपमानित करून तिथून चक्क बाहेर काढण्यात आले.राजसिंग यांना हा अपमान सहन झाला नाही ते, म्हणाले, मी नेमका काय गुन्हा केला आहे? माझा दोष काय आहे ?मला का खेळू दिले जात नाही? केवळ द्वेष आणि आकसापोटी वा माझ्या विषयीच्या इर्षेपोटी तुम्ही मला ही स्पर्धा खेळू देत नाही आसा राग व्यक्त करीत तेथे पोलिसांना पाचारण केले.पोलीस म्हणाले की तुम्ही अडथळा आणु नका तुम्हाला अटक करू.त्यांनी पोलिसांना लेखी निवेदन दिले की माझा अपमान झाला आहे. मी जागतिक दर्जाचा ज्येष्ठ खेळाडू असताना मला विनाकारण अपमानित केले त्यामुळे मी संघटनेवर बदनामीचा दावा करणार असल्याचे पत्र त्यांनी पोलीस आयुक्त रीतेशकुमार ट्विटर वर पाठवले व डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दखल केला.
काय म्हणाले राजसिंग ,’ साहेब , माझे जगामध्ये सहावे रँकिंग
आयोजकांनी मला कोणतेही कारण न देता तिथून चक्क हाकलून दिले. मी वयाच्या 13 वर्षापासून या शहरात बॅडमिंटन खेळतो आहे.आज 48 वर्षे झाली. आम्ही बॅडमिंटन हा खेळ फक्त खेळत नाही तर शहरात रुजवला. अनेक औषध खेळाडू आम्ही तयार केले शहरासाठी माझे फार मोठे नाही परंतु खारीचा वाटा या खेळामध्ये आहे. मी हौशी ज्येष्ठ खेळाडू आहे माझे जगामध्ये सहावे रँकिंग आहे. मी जगातील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत असतो. विमानाने जातो स्वतः फीस भरून अनेक स्पर्धा तिथे खेळतो. मागच्याच वर्षी मी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले.मी गरीब खेळाडूंना मदतही करतो हे सांगण्याचा उद्देश असा की मी निरपेक्षपणे समाजसेवा आणि खेळ असे दोन्ही गोष्टी करत असतो जिथे जिथे अन्याय होतो तिथे मी जाऊन जात असतो अशावेळी माझ्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूचा अपमान करण्याचा यांचा काय उद्देश आहे यापुढे यामुळे मी अतिशय व्यतीत झालो आहे.