गुरुग्राम, भारतातील जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य कंपनी एअर इंडियाने आपल्या प्रवाश्यांना मदत मिळावी म्हणून AI.g, जनरेटिव्ह एआय- संचलित आभासी यात्रा सहाय्यक (व्हर्च्युअल ट्रॅव्हल असिस्टंट) ची उपलब्धता वाढविली असून आता ते व्हॉट्स अॅपवरही उपलब्ध होईल. व्हॉट्स अॅपवर बहुभाषिक चॅटबॉटच्या अखंड आणि अमर्याद उपलब्धतेने एअर इंडियाला प्रवाश्यांना सहाय्य करण्यासाठी एक नवीन पर्याय खुला करून दिला. या माध्यमातून एअर इंडियाचे प्रवासी व्हॉट्स अॅपवर यात्रेसंबंधीच्या १३०० पेक्षा जास्त विषयांवर प्रश्न विचारू शकतात. शिवाय त्यांना अनेक सुविधा व फिचर्सही उपलब्ध होतील. आता एअर इंडियाचे प्रवासी व्हॉट्स अॅपवरील चॅटच्या माध्यमातून सहजपणे विमानाची प्रत्यक्ष त्या वेळेची (रिअल टाइम) परिस्थिती आणि सामानाची माहिती मिळवू शकतील. त्याशिवाय आपले बोर्डिंग पास डाऊनलोड करु शकतील किंवा त्यांच्या ई-तिकिटाची प्रत मिळवू शकतील. तसेच जर प्रवाश्यांनी एखाद्या विषयासंदर्भात मदतीची ग्राहक सेवा केंद्राला ऑनलाइन विनंती केली असेल तर त्या विनंतीची नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील त्यांना व्हॉट्स अॅपवरच समजू शकेल आणि ते एअरलाइन च्या ग्राहक सेवा केंद्राला फोन न करता प्रवासासमबंधी अनेक प्रश्न विचारू शकतात.
एअर इंडियाच्या ग्राहकांची जगभरात वाढत असलेली संख्या पाहता त्यांना मदतीसाठी AI.g हिन्दी, इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या चार भाषेमध्ये उत्तरे देईल. एयरइंडियाचे अतिथी AI.g बरोबर +९१ ९६६७०३४४४४ या व्हॉट्स अॅप क्रमांकावरुन संपर्क साधू शकतात.
एयरइंडियाचे ग्राहक अनुभवचे प्रमुख अधिकारी (चीफ कस्टमर एक्सपिरियंस ऑफिसर) श्री. राजेश डोग्रा याबाबत म्हणाले, “एयरइंडियामध्ये आम्ही आमच्या प्रवाश्यांचा प्रवास अगदी प्रत्येक स्तरावर (प्रत्येक टच पॉइंटवर) सुखकर, आनंददायी आणि सोपा व्हावा म्हणून सातत्याने नवनवीन व कल्पक सेवा सुविधा आणि कल्पना आणित असतो. AI.g च्या आधारे व्हॉट्स अॅपवर सेवा हे आमच्या या वचनबद्धतेचेच प्रमाण आहे. आमच्या ग्राहकांना २४ तास, अगदी त्यांच्या हाताच्या बोटावर उपलब्ध होईल इतकी सहज, तत्काळ व योग्य माहिती पुरवून सहाय्य करण्याची आणि जेथे जेथे आमचे ग्राहक आहेत तेथे तेथे पोहोचण्याची आमची स्वप्नदृष्टी आहे. व्हॉट्स अॅपची त्वरित व सहज उपलब्धता आणि त्याची व्याप्ती आमच्या या स्वप्नदृष्टीला अत्यंत सुसंगत व पूरक आहे.”
जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्याने AI.g ला प्रवासी कोणते प्रश्न विचारतात ते समजून घेणे आणि त्यांना साध्या व जास्त सौहार्दपणे उत्तर देण्यास मदत होईल. ज्या प्रश्नांची उत्तरे AI.g लगेच देऊ नाही अशा प्रश्नांमधून AI.g शिकू शकते. यामुळे AI.g ला नंतर अधिक कार्यक्षम होण्यास मदत होते. याचा अर्थ असा की, आता या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला बुकिंग, सामान, विमान बदलणे अशा विषयांबाबत प्रश्न असल्यास तुम्हाला स्वयंचलित पद्धतीने अधिक जलद उत्तरे मिळतील. यामुळे एअरइंडियाच्या टीमला गुंतागुंतीचे व जास्त महत्त्वपूर्ण प्रश्न हाताळण्यासाठी आणि प्रवाश्यांबरोबर जास्त मूल्यवर्धित संवाद साधण्यासाठी वेळ मिळेल.