महिंद्रातर्फे 11.19 लाख रु. (एक्स-शोरूम) किमतीत बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG सादर

Date:

मुंबई, 30th जून 2025: भारतातील नंबर 1 पिकअप ब्रँड बोलेरो पिक-अपचे निर्माते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज आपली संपूर्णपणे नविन बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG सादर केली असून लहान व्यावसायिक वाहन विभागात एक नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे. 11.19 लाख रु. (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण पिकअपमध्ये 1.85 टनची सर्वाधिक पेलोड क्षमता आहे. त्यामुळे ग्राहकांना अतुलनीय क्षमता आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळते.

एक मजबूत 2.5-लिटर टर्बोचार्ज्ड CNG इंजिनद्वारे संचालित बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG 61 kW आणि श्रेणीत सर्वोत्तम 220 Nm टॉर्क @ 1,200–2,200 rpm वितरीत करते, जे कठीण भार परिस्थितीतही अतुलनीय कार्यक्षमता सुनिश्चित करते. विशेषतः लांब पल्ल्याच्या कामकाजासाठी डिझाइन करण्यात आलेले हे वाहन एक सिंगल CNG पूर्ण भरल्यावर 400 किमी*  पर्यंतचा प्रभावी प्रवास करू शकते. यामध्ये 180-लिटरची टाकी क्षमता आहे. हे वाहन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पॉवर स्टीअरिंगसह सुसज्ज असून शहरी आणि निमशहरी परिसरात सहजपणे चालवता येते.

बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG हे महिंद्राचे पहिले CNG पिकअप असून, यामध्ये प्रगत iMAXX टेलिमॅटिक्स सोल्यूशनद्वारे समर्थित आधुनिक कनेक्टेड तंत्रज्ञान आहे. ही नाविन्यपूर्ण प्रणाली रिअल-टाईम वाहन माहिती पुरविते. त्यामुळे जास्त कार्यक्षम कामकाज आणि अधिक स्मार्ट फ्लीट व्यवस्थापन शक्य होते. चालकाच्या आरामाला प्राधान्य देत, या पिकअपमध्ये एअर कंडिशनिंग व हीटिंग सिस्टम असून त्यामुळे सर्व हवामान परिस्थितींमध्ये वाहन चालवणे सुलभ होते. तसेच उंचीनुसार अॅडजस्ट करता येणाऱ्या ड्रायव्हर सीटमुळे एर्गोनोमिक सपोर्ट मिळतो. शिवाय, D+2 आसनरचना यामुळे या वाहनाचा वापर अनेक प्रकारच्या उपयोजनांसाठी केला जाऊ शकतो.

3050 mm लांबीचा प्रशस्त कार्गो बेड असलेले हे वाहन सहजतेने मोठे लोड हाताळू शकते. यामध्ये मजबूत 16-इंच टायर आणि पुढील व मागील अ‍ॅक्सलवर टिकाऊ लीफ स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आले आहेत. ते विविध प्रकारच्या प्रदेशात उत्कृष्ट पकड आणि स्थिरता पुरविते.

महिंद्राने बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG चे सादरीकरण करून मजबूती, टिकाऊपणा, विश्वासार्हता, कमी देखभाल खर्च आणि उच्च पुनर्विक्री मूल्यासंदर्भातील आपले नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. भारताच्या वाहतूक व लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या सतत बदलत्या गरजांना पूर्ततेसाठी हे भविष्यकालीन उपयुक्त वाहन खास तयार करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...