नृत्यातून उलगडला गुरु शिष्य परंपरेचा वारसा

Date:

उद्गारतर्फे पं. रोहिणी भाटे यांना नृत्यांजली अर्पण. 

पुणे ता. 30: पं. रोहिणीताई भाटे यांच्या नृत्यशैलीचा वारसा लाभलेल्या संगीताचार्य आसावरी पाटणकर यांच्या शिष्यांकडून बहारदार नृत्यरचना सादर करत गुरु पं. भाटे यांना नृत्यांजली अर्पण करण्यात आली. उद्गार संस्थेतर्फे आयोजित संवेदना या कार्यक्रमातून गुरु शिष्य परंपरेचा वारसा उलगडला.

बाल शिक्षण मंदिर, मयूर कॉलनी कोथरूड येथे हा कार्यक्रम पार पडला. यास ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज, उस्ताद उस्मान खान, उस्ताद फैय्याज हुसैन खान आदी मान्यवर उपस्थित होते.

 स्वतः आसावरीताई व त्यांच्या शिष्यांनी नृत्यरूपी गुरुदक्षिणा देत रोहिणीताई भाटे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. दुर्गा स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उद्गारच्या शिष्यांनी ताल धमार अतिशय सक्षमपणे पेलत, त्याची सुंदर मांडणी करत तो पूर्ण तयारीनिशी प्रेक्षकांसमोर मांडला. ज्येष्ठ तबलावादक गुरु पं. अरविंदकुमार आजाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या रचना व काही बंदिशी सादर करत उत्कृष्ट पदन्यासाचे शिष्यांनी दर्शन घडविले.  

अपर्णा पानसे यांनी कवी सुरदास रचित प्रीती करि काहू, सुख ना लह्यो यावर केलेला नृत्याभिनय रसिकांना विशेष भावला. तर साडेनऊ मात्रांच्या ताल सादरीकरणातून त्यांच्यातील सूक्ष्म अभ्यासू वृत्तीची झलक प्रेक्षकांना घडली. सीतेचे क्रोध हरण हा आसावरीताईंचा स्वरचित गतभाव तसेच राधा ही संरचना यातून नृत्याविष्कार आणि अभिनय याची सुंदर सांगड प्रेक्षकांनी अनुभवली. गुरूंकडून लाभलेल्या परंपरेला स्वत:च्या विचारातून दिलेला आयाम हे या एकूणच सादरीकरणाचे वैशिष्ट्य होते.

 यावेळी तबला श्री आदित्य देशमुख, संवादिनी देवेंद्र देशपांडे, गायन अर्पिता वैशंपायन आणि बासरी आदित्य गोगटे यांनी समर्पक साथ दिली.

श्रृंगाली परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...