पुणे, जून २३ २०२५ – कोपा मॉल या पुण्यातील प्रीमियर लाइफस्टाइल आणि रिटेल डेस्टिनेशनने पुणेकरांना खास
रोबोटिक्स शोमध्ये हजेरी लावण्यासाठी आमंत्रित केले आहे. तंत्रज्ञान, मजामस्ती आणि प्रत्यक्ष अनुभवातून खूप
शिकवणारा हा अशाप्रकारचा पहिलाच शो आहे. या साठी मॉलचे सेंट्रल अट्रियम आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले
असून तिथे सर्व वयोगटाच्या ग्राहकांना इंटरअक्टिव्ह चॅलेंजेस आणि थीम झोनमधून रोबोटिकच्या दुनियेचा आनंद
घेता येईल. महिनाभर सुरू राहाणार असलेल्या या रोबोलँडमुळे कुटुंब, मित्रपरिवार आणि तंत्रज्ञानप्रेमी अशा सर्वांना
अनोखा अनुभव घेता येणार आहे.
रोबोलँडमध्ये रोबोटिक्सवर आधारित गेम्स खेळायला मिळणार असून त्यात नेहमीच्या खेळांना तंत्रज्ञानाची जोड
देण्यात आली आहे. रोबो सॉकर आणि फ्युचर हॉकीपासून टेक कबड्डी आणि रोबो सुमोपर्यंत प्रत्येक उपक्रमात खेळाचं
नवं रूप अनुभवता येणार आहे. सेन्सर्स, जॉयस्टिक्स आणि प्लेयर ड्रिव्हन स्ट्रॅटेजीचा त्यात समावेश असेल. थ्रिलच्या
चाहत्यांना इथं मॉन्स्टर एरिना, डॅश कार्स आणि ड्रोन वर्ल्डची मजा घेता यील, तर रोबो मेझ आणि शॉक वेव
चॅलेंजमध्ये समस्या सोडवण्याच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. या रोबोटिक्स शोचं मुख्य आकर्षण म्हणजे
ह्युमनाइड रोहोट एंटरटेनमेंट झोन, जिथं डान्स करणारे, संवाद साधणारे रोबोट्स सर्वांचं लक्ष वेधून घेतील.
रोबोलँडमध्ये औद्योगिक थीमचा सेटअपही असून त्यात गियर्स, कनव्हेयर बेल्ट्स, अम्बियंट लायटिंगचा समावेश आहे.
हा सेटअप थेट एखाद्या साय-फाय सिनेमातून आल्यासारखा भासत असल्यामुळे लहान मुलांमध्ये उत्सुकता निर्माण
करेल, तर मोठ्यांमध्ये नॉस्टॅल्जिया जागा करेल.
प्रवेश शुल्क सहज परवडण्यासारखे असल्याने ही जागा पुण्यात कुटुंबाला एकत्र वेळ घालवण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान
अनुभवण्यासाठी आणि रोबोलँडमध्ये मजा करण्यासाठी योग्य आहे.
स्थळ: कोपा मॉल
तारीख: सुरू आहे
वेळ: दुपारी १२ ते रात्री ९
कोपातर्फे तरुणांसाठी तंत्रज्ञानाची मजा देणारे रोबोलँड
Date: