पुणे-
परमपूज्य नागासाधूंनी नुकतीच नेत्र तपासणीच्या एका विशेष मोहिमेतून लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण केली होती. या मोहिमेसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. परमपूज्य नागा साधूंनी नागा सेंट आय टेस्ट या प्रभावी सार्वजनिक आरोग्य उपक्रमाचा प्रचार केला. या उपक्रमाला कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटीव्हिटी २०२५ या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी या पुरस्काराच्या आरोग्य आणि कल्याण या श्रेणीत या उपक्रमाला रौप्य सिंह (सिल्व्हर लायन) पुरस्कार मिळाला. हा उपक्रम गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लि.ने आयबेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने राबवला होता. आयबेट्स फाऊंडेशन ही मधुमेह आणि अंधत्वाबाबत जागरुकता निर्माण करणारी नावाजलेली संस्था आहे.
एका अभ्यासानुसार, सुमारे १० कोटी भारतीयांना मधुमेहाचा आजार जडला आहे. दुर्दैवाने त्यापैकी ६० टक्के लोकांना आपल्याला मधुमेह झाल्याचे ज्ञात नाही. मधुमेहाचे वेळीच निदान झाल्यास लोकांमध्ये अंधत्व टाळता येते. ही बाब लक्षात घेत गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या अंतर्गत काम करणा-या गोदरेज क्रिएटीव्ह लॅब या क्रिएटिव्ह स्टुडिओने नागा सेंट आय टेस्ट ही संकल्पना तयार केली. या मोहिमेच्या माध्यमातून मधुमेहामुळे होणा-या अंधत्वावार मात करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी असा संकल्पना वापरण्यात आला आहेत. ही मोहिम भारतीय संस्कृतीतील संदर्भ अधोरेखित करते.

या नेत्रतपासणीसाठी नामी युक्तीचा वापर करण्यात आला. नागा साधूंच्या पाठीवर काही अक्षरे लिहिली गेली. त्यांच्या उघड्या पाठीवर देवनागरी लिपीत ठळक हिंदी अक्षरे लिहिली गेली. ही अक्षरे चालते फिरते दृष्टी तपासणी फलक ठरु लागले. आरोग्य अधिका-यांनी नागा साधूंच्या पाठीवरील अक्षरे वाचता न आलेल्या साधूंना मोफत डोळे तपासणी शिबीरात पाठवण्यात आले. ही आरोग्य मोहिम यंदाच्या २०२५ च्या महाकुंभ मेळाव्यात पार पडली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ही नेत्र तपासणी मोहिम आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमाबाबत गोदरेज क्रिएटिव्ह लॅबच्या इनहाऊस क्रिएटीव्ह स्टुडिओच्य ग्लोबल हेड स्वाती भट्टाचार्य यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘गुंतागुंतीच्या मानवी समस्यांवर सोप्पे उपाय अंमलात आणता येतात. ज्यावेळी नागा साधू समाजाने या उपक्रमाला हो म्हटलं त्यावेळीच आमचा विजय झाला. आता या पुरस्कारामुळे आयबेट्स फाऊंडेशनला संपूर्ण जगात ओळख मिळेल. आमच्या कल्पनेने जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक महोत्सवातून जगातील सर्वात मोठ्या क्रिएटिव्ह फेस्टिव्हलपर्यंत प्रवास केला आहे.’’
आयबेट्स फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. निशांत कुमार यांनीही या आरोग्य मोहिमेबद्दल माहिची दिली. ते म्हणाले, ‘‘ मधुमेहामुळे होणारे अंधत्व टाळता येते. मुळात हा विषय माझ्या हृदयाच्या जवळचा आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि गोदरेज क्रिएटिव्ह लॅबच्या सहयोगातून आम्ही महाकुंभमध्ये जनजागृतीला सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत आणि भावनितदृषट्या प्रभावी पद्धतीने रुपांतरित केले आहे. नागा साधूंनाच नेत्रतपासणी फलक म्हणून वापरल्याने लोकांची कल्पनाशक्ती जागृत झाली. हजारो भाविकांनी संबंधित ठिकाणीच नेत्रतपासणी केली. कान्स फेस्टिव्हलमध्ये सिल्व्हर लायन पुरस्कार मिळणे ही या उपक्रमामागील सर्जनशीलता आणि उद्देशाला मिळालेली मान्यता आहे. ’’ लोकांचे डोळे आणि जीव दोन्ही वाचवणा-या भारतीय कल्पकतेला जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आणले गेल्याबद्दलही डॉ. कुमार यांनी समाधान व्यक्त केले.
महाकुंभ २०२५ मध्ये नागा सेंट आय टेस्ट ही नेत्रतपासणी मोठ्या स्तरावर राबवली गेली. या उपक्रमाद्वारे आयोजकांना ६० कोटी लोकापर्यंत पोहोचता आले. तब्बल ४ लाख लोकांनी डोळ्यांची तपासणी केली. हा उपक्रम कुंभमेळ्यातील आरोग्य सेवा देणारा सर्वात मोठा उपक्रम ठरला.
महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यांमध्ये महत्त्वाचा मानला जातो. या जागतिक स्तरावरच्या मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यात जीसीपीएल आणि आयबेट्स फाऊंडेशनने अत्यंत महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्येला सर्वांसमोर मांडले. परंपरा आणि श्रध्देचा आधार घेत लोकापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलेला हा उपक्रम अविस्मरणीय ठरला.