गुरुग्राम,डिसेंबर २०२३ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने आज पहिल्या २० एयरबस A350-900 एयरक्राफ्टमधील पहिल्या एयरक्राफ्टचे स्वागत केले. व्हीटी- जेआरए नोंदणीकृत हे विमान एयरलाइनच्या नव्या, बोल्ड रूपात पाहायला मिळणार असून कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या रुपांतरणाच्या प्रवासात ते महत्त्वाचा टप्पा ठरेल.
हे एयरक्राफ्ट टुलुझ, फ्रान्स येथील एयरबस केंद्रातून नवी दिल्ली येथे आज १३:४६ वाजता (स्थानिक वेळ) पोहोचले. AI350 हे खास चिन्ह वापरलेल्या या डिलीव्हरी फ्लाइटचे एयर इंडियाच्या प्रतिनिधींनी स्वागत केले. एयर इंडियाच्या वरिष्ठ कमांडर कॅप्टन मोनिका बत्रा वैद्य या ऑबर्झव्हर म्हणून या विमानात उपस्थित होत्या. AI350 वर राहाण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या काही भारतीय पायलट्समध्ये त्यांचा समावेश होतो.
पहिले नवीन वाइडबॉडी फ्लीट दशकापेक्षा जास्त काळ भारतात वापरणारी एयर इंडिया भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यात आघाडीवर असून A350 वापरणारी पहिली भारतीय विमानकंपनी ठरली आहे. २०१२ मध्ये बोईंग ७८७ ड्रीमलायनर फ्लीट टाइप वापरणारी एयर इंडिया ही पहिलीच भारतीय विमानकंपनी होती.
एयर इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, ‘एयर इंडियासाठी हा दिवस लक्षणीय आहे. A350 आमच्यासाठी केवळ धातू किंवा इंजिन नाही, तर ते आमचे कर्मचारी कंपनीचे स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी घेत असलेल्या अविरत प्रयत्नांचे आणि नवे मापदंड तयार करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. त्याचबरोबर या निमित्ताने जागतिक पातळीवर भारतीय विमानवाहतूक क्षेत्राचा नव्याने उदय होत आहे.’
नव्या युगातील विमानवाहतुकीचे प्रतीक असलेलेA350 जागतिक दर्जा, आमच्या विना- थांबा मार्गांवर दीर्घकाळ प्रवासाचा वैशिष्ट्यपूर्ण आणि आरामदायी अनुभव देईल. याचे असामान्य फ्लाइट इकॉनॉमिक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यावसायिक यश मिळवण्याची आमची बांधिलकी आणि शाश्वततेचे ध्येय साध्य करण्याचा ध्यास अधोरेखित करणारा आहे, असे विल्सन म्हणाले.
एयर इंडियाचे A350 जानेवारी २०२४ मध्ये व्यावसायिक सेवेत दाखल होईल. सुरुवातील कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी ते देशांतर्गत सेवा देणार असून त्यानंतर विविध खंडांतील वेगवेगळ्या ठिकाणी ते सेवा देईल. A350 चे व्यावसायिक वेळापत्रक येत्या काही आठवड्यांत जाहीर केले जाईल.
एयर इंडियाच्या A350-900 एयरक्राफ्टमध्ये कॉलिन्स एयरोस्पेसतर्फे ३१६ सीट्ससह थ्री- क्लास केबिन कॉन्फिगरेशन डिझाइन करण्यात आले आहे. त्याशिवाय २८ खासगी बिझनेस क्लास स्वीट्स फुल- फ्लॅट बेड्स, २४ प्रीमियम इकॉनॉमी सीट्स अतिरिक्त लेगरूम व इतर विविध वैशिष्ट्यांसह देण्यात आले आहे. यामध्ये २६४ प्रशस्त इकॉनॉमी क्लास सीट्सचाही समावेश आहे. एयरक्राफ्टमधील सर्व सीट्समध्ये अत्याधुनिक पॅनासॉनिक eX3 इन- फ्लाइट एंटरटेनमेंट सिस्टीम आणि एचडी स्क्रीन्सचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे प्रवासाचा आनंद आणखी द्विगुणित होतो.
हे एयरक्राफ्ट एयर इंडियाच्या २० एयरबस A350-900 ऑर्डरपैकी पहिले असून मार्च २०२४ पर्यंत आणखी ५ वितरित केली जातील. एयर इंडियाने एयरबसकडे दिलेल्या २५० नव्या एयरक्राफ्टमध्ये २० A350-1000 चा समावेश आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या सर्व गेस्ट टचपॉइंट्सवर नव्या ग्लोबल ब्रँड ओळखीचा प्रसार सुरू केला असून त्याचबरोबर ग्राहकाभिमुख संकेतस्थळ आणि मोबाइल अप लाँच केले आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने केबिन आणि कॉकपिट क्रु साठी बहुप्रतीक्षीत युनिफॉर्म्सचे अनावरण केले. हे युनिफॉर्म्स भारतीय सेलिब्रेटी डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केले आहेत. A350 च्या आगमनानंतर एयर इंडियाचा केबिन क्रु आणि पायलट्स नव्या युनिफॉर्ममध्ये दिसतील.