हा तर संपूर्ण लॉकडाउन! रस्त्यावर उतरून कायदेभंग करू -खा.बापटांचा इशारा

Date:

पुणे – मिनि लॉकडाउनच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने शहरात संपूर्ण लॉकडाउन केला असून, त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प होणार असून, शहराची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम हे अन्यायकारक आहे. पुण्यात लादलेले नियम तातडीने शिथिल करावेत आणि राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेली नियमावली लावावी अशी मागणी खासदार गिरीश बापट आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. अन्यथा रस्त्यावर उतरून कायदेभंग करू असा इशारा दिला.

खासदार बापट म्हणाले, ‘विमान, रेल्वे, एसटी यांच्यासह संपूर्ण राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहाणार आहे. मात्र पुणे शहराची जीवनवाहिनी असणारी पुणे महानगरप परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्या अत्यावश्यक सेवा वगळता ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. या बससेवेचा दररोज पाच लाख प्रवासी लाभ घेतात. केवळ पाच रुपयांत प्रवास करता येत असल्याने सर्वसामान्यांना परवडणारी ही सेवा आहे. परंतु ती बंद केल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.’

मुळीक म्हणाले, ‘शहरातील सर्व प्रकाराची दुकाने यापूर्वी सायंकाळी सहावाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, सुधारित आदेशात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने वळता सर्व प्रकाराची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील छोटे व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कर्मचार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना रोजचा उदरनिर्वाह अवघड होणार आहे.’

शहरात कोरोनाबाधितांसाठी अधिकाधिक बेड उपलब्ध करून द्यावेत, ऑक्सिजनयुक्त आणि व्हेंटिलेटरचे बेडस उपलब्ध होत नाहीत, त्यांची मोठ्या प्रमाणात सं‘या वाढवावी, कोरोना चाचण्यांची सं‘या वाढवावी, लसीकरणाचा वेग वाढवावा, आवश्यकतेनुसार डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या कराव्यात. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक माहिती यंत्रणा विकसित करावी अशा मागण्या पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या सर्वांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
 शहरात रात्री आठनंतर संचारबंदी करावी, सर्व व्यावसायिकांना रात्री आठ पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा द्यावी आणि रात्री आठपर्यंत पीएमपीची बससेवा पूर्ववत करावी अशा भारतीय जनता पार्टीच्या मागण्या आहेत. त्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून कायदेभंग करावा लागेल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

पुणे शहर भाजपच्या वतीने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आजपासून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्तरावर लसीकरणासंदर्भात माहिती, मार्गदर्शन, जनजागृती, नोंदणी प्रकि‘या करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...