पुणे- एका वर्षाला ४ फिल्म हिट झाल्या म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्री श्रीमंत झाली असे होत नाही . यातील अनेक उणीवा दूर करायला हव्यात असे सांगत आपल्या सिनेमाचे वितरण आपणच करणार … आपला आपल्या सिनेमावर विश्वास असल्याने स्वतःच यापुढे स्वताच्या सिनेमांचे वितरण करणार असे स्पष्टीकरण आज येथे प्रख्यात दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिले
३ जून रोजी उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेला बोनी कपूर प्रस्तुतकर्ता असलेला ‘लालबागची राणी’ हा चित्रपट प्रदर्शीत होतो आहे . त्यानिमित त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पाहू यात काय म्हणाले उत्तेकर …