केजे शिक्षण संस्थेतील ३६० विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरी
पुणे : येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इंस्टिट्यूटच्या विविध महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेतील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ३६० हुन अधिक विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. यामध्ये ट्रस्ट संचलित ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालय, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग आणि केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून वोक्सवगन, आयबीएम, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, पर्सिसटन्ट, झेन्सार, एनटीटी डाटा आदी राष्ट्रीय व बहुराष्ट्री कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. या विद्यार्थ्याना आत्तापर्यंतचे सर्वाधिक १२ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. टेक महिंद्रा या अंतरराष्ट्रीय कंपनीत सर्वाधिक ११८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, कोषाध्यक्ष विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, विभावरी जाधव, संचालक डॉ. एच. के. अभ्यंकर, डॉ. व्हि. जे.काखंडकी यांचे प्रात्साहन मिळाले. संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी व व्यवस्थापना ने केलेल्या सततच्या प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झाले आहे. संस्थेच्या आवारातील अभियांत्रिकीच्या सर्व संस्था राष्ट्रीय गुणवत्ता मुल्यमापन संस्थेद्वारे उत्तम ठरल्या आहेत. यामध्ये संस्थेचे सर्व प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. निलेश उके, डॉ. बी. एम शिंदे, सर्व प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. अनिल अग्रवाल प्रा. किरण पवार, प्रा. विजय मेमाणे आणि प्रा. राजूसिंग राठोड यांचे प्रयत्न मोलाचे आहेत.
या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून कल्याण जाधव म्हणाले, “महाविद्यालयातील उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्तावाढ, महाविद्यालयाला मिळालेली नॅकची ‘अ’ श्रेणी आदी बाबी विचारात घेऊन अनेक नामवंत कंपन्या केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये येऊन अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि मुलाखती घेतात. त्यातून मुलांची निवड करतात. तीनही अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधून नोकरीची संधी मिळाली आहे.”