पुणे-
अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरा च्या गोशाळेतील गायींच्या चाऱ्यासाठी मदत…
अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मंदिरा द्वारे गोशाला चालविली जाते.यावर्षी दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पुण्यातील स्वामीभक्त भाजप ओ.बी.सी आघाडीचे शहर सरचिटणीस यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी मंदिराचे मुख्य पुजारी मंदार गुरुजी यांना संपर्क साधला व चाऱ्यासाठी मदत देऊ केली.मंदार गुरुजींनी स्वामीभक्त सतीश गायकवाड यांच्या भावना लक्षात घेऊन पुण्यात येण्याचे मान्य केले.त्यानुसार मंगळवार पेठेतील स्वामी समर्थ मंदिरात एका समारंभाचे आयोजन करण्यात आले व भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यांच्या हस्ते गोधनाच्या चाऱ्यासाठी २५००० रुपयाचा निधी मंदिराचे मुख्य पुजारी मंदार गुरुजी यांना सुपूर्द करण्यात आला.यावेळी शिक्षण मंडळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर,पतित पावन संघटनेचे प्रांत राजाभाऊ पाटील,भाजप कॅन्टोनमेंट मंडळ अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित ,राजाभाऊ भोरडे ई उपस्थित होते.श्री.सतीश गायकवाड यांनी स्वत:चे अनेक कौटुंबिक खर्च टाळून गोधनासाठी हा निधी दिला यात त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो असे गौरवोदगार संदीप खर्डेकर यांनी काढले.तसेच दुष्काळाच्या भीषणतेचे चटके बसायला लागले असून गायकवाडांच्या सतकृत्याचे अनुकरण इतरांनी ही करावे असे ही ते म्हणाले.तर मंदार गुरुजींनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना,मदतीच्या रकमेपेक्षा त्यामागची भावना मोलाची असून त्यासाठी आपण पुण्यात आल्याचे सांगितले.यावेळी गुरुजींनी श्री.संदीप खर्डेकर,सौ.मंजुश्री खर्डेकर व सतीश गायकवाड यांच्या स्वामींची प्रतिमा व प्रसाद देऊन सत्कार केला.
सूत्र संचालन जयप्रकाश पुरोहित यांनी केले तर सतीश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.