पुणे-
वर्षपूर्ती निमित्त “नगरसेविका आपल्या भेटीला” उपक्रमास प्रारंभ….
महिलांनी स्वच्छते विषयी जागरूक असणे गरजेचे असून त्यांनी आपले घर स्वच्छ ठेवतानाच आपल्या भोवतीचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि ओला व सुका कचरा वेगळा करून देतानाच सँनेटरीन नँपकिन पँक करुनच वेगळे द्यावे असे आवाहन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले.नगरसेविका पदी निवडून आल्याच्या वर्षपूर्ती निमित्त विविध सोसायटी व वस्ती विभागातील नागरिकांची भेट घेणे,कचरा बकेट वाटप करणे व महिलांनीच स्वच्छता मोहीम राबवीण्यात कसा हातभार लावता येईल याबाबत जनजागृती मोहिमेचा प्रारंभ एरंडवण्यातील दहा चाळ येथे करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी संगीताताई आधवडे, जया काळे,संगीता सातपुते,पार्वती पवार, जया बारमुख,मोनीका पायगुडे,मंजु जाधव,कवीता सुपेकर,उषा सुपेकर,अनिता काळे,ममता भारती, लता सस्ते,सुनिता घवाने,अनीता जय काळे,इ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.ह्या महीलांनी आपल्या समस्या सांगीतल्या व त्याबाबत मंजुश्रीताईंनी लगेचच कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे आभार ही मानले.त्याच बरोबर गौरव सोसायटी व संगमश्री सोसायटी येथेही ही मोहीम राबविण्यात आली.यावेळी संगमश्री सोसायटीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव ढेकणे,सचिव आनंद पारगावकर,सुरेश कुलकर्णी,राजेंद्र घैसास,सुहास बल्लाळ,वासंती नगरकर,सौ घैसास,गौरव सोसायटीचे अध्यक्ष श्री व सौ दीपक आशर इ मान्यवर उपस्थित होते.
सौ मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या “२३ फेब्रुवारी २०१७….पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ (क) मधुन माझा विजय झाला त्याला एक वर्ष पूर्ण झाले….माझ्यावर प्रभागातील नागरिकांनी विश्वास दाखवला आणि मी ही माझ्या परीने ही जबाबदारी पार पाडत आहे….प्रभागातील नागरिकांना अपेक्षित असणारे कार्य माझ्या हातून घडावे यासाठी मी प्रयत्नरत आहे.विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सातत्याने संपर्कात आहोतच पण वर्षपूर्ती होत असताना *नगरसेविका आपल्या भेटीला* हा उपक्रम राबवित आहे,*वर्षपूर्ती होत असताना “मनपाच्या सर्वसाधारण सभेस १००% उपस्थिती + विकास निधीचा वापर हा नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार + बजेट तरतूदीतील ९०% कामे सुरु व बहुतांश पूर्णत्वास + सभागृहात भटक्या कुत्र्यांच्या विषयासह,डी पी रोड वरील अनधिकृत बांधकामांचा विषय व इतर विषयांच्या मांडणीत सक्रिय + ५० पेक्षा जास्त उपक्रम/कार्यक्रम + Whatsapp वर नागरिकांचे ग्रूप तयार करुन त्याद्वारे दैनंदिन प्रश्न सोडविण्याचा यशस्वी प्रयोग + पक्षाच्या ही सर्व कार्यक्रमात सहभाग* याद्वारे मी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी पार पडण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या वर्षात अधिक वेगाने काम करुन प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध/वचनबद्ध, असल्याचे ही त्या म्हणाल्या.