पुणे-महापौर केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पथ सुधारणा दुरुस्ती,दुभाजक ,रेलिंग यांच्या कामातून ७५ लाख रुपये वर्गीकरणाला महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली असली तरी हि स्पर्धा नेमकी कुठे भरविण्यात यावी यावरून मात्र महापालिकेतील राजकीय नेत्यांमध्ये वड असल्याचे मुख्य सभेत स्पष्ट झाले . काही दिवसांपूर्वी हि स्पर्धा खराडी येथे होईल असे महापौरांनी जाहीर केले असताना , आज वर्गीकरणाचा ठराव स्थायी समितीतून मुख्य सभेत आला तेव्हा हा वाद स्पष्ट झाला . ठरावात .. हि स्पर्धा नेहरू स्टेडीयम येथे घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे तर … यावेळी शिवाजी आखाड्यातच स्पर्धा घ्या अशी उपसूचना देवून ठराव संमत झाला आहे ..
दरम्यान महापौर करंडक आंतरराष्ट्रीय निमंत्रीत कुस्ती स्पर्धेत रशिया आणि इराण या प्रमुख देशांसह दहा देशांनी सहभाग निश्चीत केला आहे. 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील पदकविजेत्यांना सुमारे 50 लाख रुपयांची भरघोस बक्षीस देण्यात येतील. 80 परदेशी खेळाडूंसह यात सुमारे सहाशे खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे महापौर प्रशांत जगताप व प्रमुख समन्वयक हिंदकेसरी योगेश दोडके यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली होती . याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे चिटणीस बाळासाहेब लांडगे, माजी आमदार बापू पठारे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले उपस्थित होते.
यानंतर महापालिका मुख्य सभेत पहा काय झाले …. ?