मुंबई – दिवाळी घरगुती स्वरुपात साजरी करणं हे न्यू नॉर्मल झालं आहे. बदलत्या काळाचा स्वीकार करत कल्याण ज्वेलर्सच्या ब्रँड अम्बेसिडर कतरिना कैफ कल्याण ज्वेलर्सच्या अद्यावत अमेया कलेक्शनमधील दागिने परिधान करून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून #ट्रॅडिशनऑफटुगेदरनेस ट्रेंडमधे सहभागी झाल्या आहेत.
कतरिना यांनी मोत्यांच्या लडीपासून बनवलेला आणि माणकाचे पेंडंट असलेला राणी हार परिधान केला असून सोबत सुंदर झुमके परिधान केले आहेत. सोन्याच्या बांगड्या आणि टियरड्रॉप अंगठी परिधान करून त्यांनी हा लूक आणखी उठावदार केला आहे. उत्कृष्ट हस्तकारागिरीचा नमुना असलेल्या अमेय कलेक्शनची नाजूक कलाकुसर आणि श्रीमंती डिझाइन अभिजातता दर्शवणारे आहे.
आपला अतिशय सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कतरिना म्हणाल्या, ‘अमेयाच्या या सेटसह दिवाळीसाठी सज्ज ट्रॅडिशन ऑफ टुगेदरनेससह घरीच सुरक्षित दिवाळीचा आनंद घ्या. दिवाली ट्रॅडिशन ऑफ टुगेदरनेस अमेया सेलिब्रेशनवेयर.’
कल्याण ज्वेलर्सच्या या अमेया कलेक्शनमधे माणकं, पाचू आणि मोती यांना सोने, हिरे व इतर प्रेशियस स्टोमधे गुंफण्यात आले आहेत. पारंपरिक प्रतीकं आणि अँटिक डिझाइन्स, कुंदन व पोलकी कारागिरी, प्राचीन वारशापासून प्रेरित टेम्पल डिझाइन्स, प्रेशियस स्टोन्ससह नकाशी वर्क, अनकट हिरे या कलेक्शनचा भाग आहेत. अमेया कलेक्शनमधला प्रत्येक सेट, ज्यात नेकलेस व कानातल्याचा समावेश असून त्यामुळे सणासाठी अगदी परफेक्ट लूक मिळवता येतो तसेच परंपराही जपता येते.