आयुष्यात लादलेल्या नियमांचा ‘करार’

Date:

माणसांच्या स्वभावगुणानुसार त्याचा आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलत असतो. स्वतःहून आखलेल्या नियमानुसार आयुष्य जगण्याचा अनेकजण प्रयत्न करतात, या नियमात अनेकजण यशस्वी होतात तर काही फसतात. मनोज कोटियन दिग्दर्शित ‘करार’ या सिनेमात ‘आयुष्य’ आणि ‘नियम’ या दोन गोष्टी अधोरेखित केलेल्या दिसून येतात. जीवनात यशस्वी होण्याकरिता स्वतःशी प्रामाणिक करार करणाऱ्या सुनील मोकाशी या एका इन्शुरन्स एजंटची ही कथा आहे. भविष्यात त्याला मोठा अधिकारी बनायचे असल्यामुळे, वर्तमानामध्ये अनेक तडजोडी करण्याची त्याची तयारी आहे. त्यासाठी स्वतःच्या बायकोच्या भावनांचा देखील तो विचार करत नाही. सुनीलची पत्नी जयूला आई व्हायचे आहे. मात्र आपल्या नियमात मूल बसत नसल्याचे सांगत सुनीलने तिला अनेक वर्ष मातृत्वापासून वंचित ठेवले आहे. आपल्या या करारबद्ध पतीच्या स्वभावामुळे जयू मनोमन दुखावते. त्यांच्याकडे घरकामासाठी राधा ही एक विधवा महिला कामाला आहे. स्वभावाने मायाळू असणारी ही राधा जयुची चांगली मैत्रीणदेखील आहे. बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवलेल्या आपल्या मुलाच्या संगोपनासाठी ती या दाम्पत्यांच्या घरी कामाला आहे. ही राधा जयुचे दुखणे जाणून घेत तिला वेळोवेळी धीर देण्याचे काम करते.

कालांतराने सुनीलचे स्वप्न पूर्ण होते. अनेकवर्ष कुटुंबनियोजन करणारे हे दाम्पत्य आता संततीचा विचार करून लागतात. मात्र, आता जयू मातृत्वासाठी परिपूर्ण नसल्याचे समजते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने सरोगसी मदरचा विचार केला जातो. संततीसाठी भाड्याने मातृत्व आणण्याची आधुनिक संकल्पना जयू आणि सुनील राधाला बोलून दाखवतात. त्याबदल्यत  योग्य ते आर्थिक सहाय्य करण्याचा ‘करार’ सुनील तिच्यासोबत करतो. मुलाच्या भावी आयुष्यासाठी राधादेखील या कराराला समंती दर्शवते. अशाप्रकारे सरोगसी मदरची मोठी जबाबदारी राधा घेते. मात्र काही महिन्यांनी सुनील नवा ‘करार’ तिच्यासमोर आणून ठेवतो.  त्याच्या या कराराच्या अतिरेकामुळे पत्नी जयू आणि राधाच्या आयुष्यात काय परिणाम होतात हे या सिनेमात पाहायला मिळेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करावे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

"पुनर्वसन प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सर्व बैठकींचा...

महिला पोलिस अधिकारी ज्योती तांबे 50 हजारांच्या लाचखोरीच्या प्रकरणी अटकेत

पुणे-पिंपरी-चिंचवडमधील बावधान पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला सहाय्यक...

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो सेवा त्वरीत सुरु करा

-माजी आमदार मोहन जोशी पुणे : वाहतुकीची गरज लक्षात घेता,...

मुख्यमंत्री फडणवीस बाईकवरून विधानभवनात दाखल

सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी मुंबई-- पंतप्रधान नरेंद्र मोदी...