स्वतच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सरकारचे हे सेल्फी शिक्षणमंत्री आहेत.
त्यामुळेच सेल्फी शिक्षणाचा उद्योग त्यांना सुचू शकतो. सेल्फीची चटक हा
वैद्यकीय शास्त्रानुसार आजार मानला जातो.
सेल्फी काढत बसण्यापेक्षा शिक्षकांना शाळेत शिकवू द्या. शिक्षकांवर
अविश्वास का दाखवता? त्यांचा अवमान का करता? विषयाला शिक्षक
नाहीत. गणित, विज्ञान, इंग्रजीचे शिक्षक सरप्लस होत आहेत. भाषांना
स्वतंत्र शिक्षक नाहीत. समाजशास्त्र विषयच काढण्याची तयारी सुरु आहे.
आधी विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरक्षित करा मग सेल्फी काढत बसा.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं आणि लागोपाठ परिक्षेचा ताण कमी केला
जात नाही. घटनेने आणि कायद्याने दिलेली जबाबदारी सरकार पाळत
नाही आणि सेल्फी काढा म्हणून सांगतं. हे दुःखद, क्लेशदायक आणि
निषेधार्ह आहे. शिक्षकांवर लाठ्या चालवल्या गेल्या त्याचे वळ अजून
सुकलेले नाहीत त्याचाही आता सेल्फी पाठवायचा का?
कपिल पाटील
शिक्षक आमदार आणि अध्यक्ष, लोक भारती