के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप २०२२साठी अर्ज मागवले

Date:

 या शिष्यवृत्तीमुळे वंचित विद्यार्थ्यांना सरकारी पॉलिटेक्निक्समधून पदविका अभ्यासक्रम करण्यात मदत मिळते.

·            अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२२ आहे.

पुणे-२ सप्टेंबर २०२२: के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट (केसीएमईटी) १९५३ सालापासून कार्यरत असून वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती देऊन हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. केसीएमईटीने महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप (एमएआयटीएस) २०२२ या आपल्या वार्षिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. भारतामधील सरकारी मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट्समधून रोजगारक्षम पदविका अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्याअल्प-उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पाठिंबा देणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. दरवर्षी १०,००० रुपयांची शिष्यवृत्ती ५५० विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ३ वर्षे दिली जाते.

या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्याने एसएससी/एचएससी किंवा १०वी/१२वी इयत्तेमध्ये तत्सम परीक्षा ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्याने सरकारी किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थेमध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवलेला असला पाहिजे. ही शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच दिली जाईल.

अर्ज करण्यासाठी फॉर्म आणि त्यासोबत आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी केसीएमईटी वेबसाईटवर उपलब्ध आहे.  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२२ आहे.  मिळालेल्या अर्जांमधून निवडण्यात आलेल्या अर्जदारांना मुलाखतीची तारीख व ठिकाण कळवले जाईल.

के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट ही शिष्यवृत्ती १९९५ सालापासून देत आहे. आजवर भारतभरातील ११,२९० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड करताना मुलीअल्प उत्पन्न गटातील कुटुंबांमधील मुलेभिन्न क्षमता असलेली मुले आणि सैन्यदल कर्मचाऱ्यांची मुले यांना विशेष प्राधान्य दिले जाते.

महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप्स मिळवलेले विद्यार्थी अडीअडचणींवर मात करून आपल्या जीवनात नवा अध्याय लिहितात. या शिष्यवृत्तीच्या साहाय्याने ज्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले असे विद्यार्थी आज कम्प्युटर इंजिनियरिंगसिव्हिल इंजिनियरिंगइन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीइलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमेकॅनिकल इंजिनियरिंग यासारख्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहाटे 3.28 वाजता सुनीता विल्यम्स सुखरूप परतल्या…

सुनीता विल्यम्सच्या वडिलांच्या गावी मिरवणूक, दिवाळीसारखा आनंदोत्सव वाशिंग्टन-तब्बल नऊ महिने...

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...